Court Bail

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

993 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान एक महत्वपूर्ण असा निर्णय दिला आहे. महिलेने विचारपूर्वक ठेवलेल्या शारिरीक संबंधांना फसवणूक म्हणता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायमूर्ती अनूप कुमार मेंदीरत्ता यांनी हा निर्णय दिला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
एका महिलेने व्यक्तीविरोधात बलात्काराचा आरोप केला होता. मात्र, नंतर दोघांनी परस्पर संमतीने प्रकरण मिटवून घेतले व नंतर लग्नदेखील केले. त्यामुळं त्या व्यक्तीविरोधातील बलात्काराचा खटला रद्द करण्यात येत आहे, असं न्यायमूर्ती मेंदीरत्ता यांनी म्हटलं आहे. या महिलेने त्या व्यक्तीच्या विरोधात बलात्काराचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीत म्हटलं होतं की, लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. मात्र, त्यानंतर लग्न करण्यास नकार दिला. त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत ठरवले होते. मात्र, नंतर दोघांनी आपापसात प्रकरण मिटवून कोर्टात लग्न केले. तक्रारदार महिलेने कोर्टात सांगितले की, गैरसमजूतीतून ती तक्रार दाखल झाली होती. कारण त्याच्या कुटुंबीयांच्या दबावामुळं त्याने लग्नासाठी नकार दिला होता. मात्र आता मी त्याच्यासोबत आनंदाने राहत आहे. मला खटला मागे घ्यायचा आहे. महिलेने खटला मागे घेण्याची इच्छा दाखवल्यानंतर न्यायालयाने त्यावर म्हणणे मांडले आहे.

काय म्हणाले कोर्ट?
कोर्टाने म्हटले आहे की, प्रकरणाचा तपास सुरू असताना आरोपी पुरुषाने स्वेच्छेने महिलेसोबत लग्न केले. त्यामुळं त्याचा लग्नाचे वचन मोडण्याचा हेतू नव्हता. त्यामुळं बलात्काराची कारवाई सुरू ठेवण्याऐवजी ती रद्द करणेच योग्य आहे. लग्नाच्या खोट्या वचनांचे पुरावे नसतील तर महिलेने विचारपूर्वक ठेवलेल्या शारीरिक संबंधांना फसवणूक म्हणता येणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे. शारिरीक संबंधांसाठीची तिची सहमती गैरसमजुतीच्या आधारावर होती, असं म्हणता येणार नाही. त्यामुळं अशा प्रकरणात पुरुषाला दोषी ठरवायचे असल्यास त्याने दिलेले वचन आणि महिलेने शारीरीक संबंधांस दिलेली सहमती यात थेट संबंध असल्याचे सिद्ध व्हायला हवे असेदेखील न्यायालयाने म्हंटले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या दिल्लीतील पंतप्रधान संग्रहालयाचे होणार उदघाटन

Posted by - April 13, 2022 0
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी, १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीनिमित्त सकाळी ११ वाजता राजधानी दिल्लीतील तीन मूर्ती भवन संकुलात…

विधानसभा निवडणूक निकाल 2023 : नागालँड आणि त्रिपुरामध्ये कमळ फुलले, मेघालयात तिरंगी लढत !

Posted by - March 2, 2023 0
मेघालय, त्रिपुरा आणि नागालँडमध्ये पुढील पाच वर्षे कोणाची सत्ता असेल, याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपने…

मोदींचा मास्टरप्लॅन ! लोकसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण करणार राज्यातील 38 प्रकल्प

Posted by - March 21, 2022 0
महाराष्ट्रात एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे ३८ प्रकल्प आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण केले जातील. या प्रकल्पांची अंदाजे मूळ…

राष्ट्रपती पदासाठी आज मतदान; द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड

Posted by - July 18, 2022 0
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदासाठी आज मतदान पार पडणार आहे. या मतदानाचा निकाल 21 जुलै रोजी लागणार आहे. त्यामुळे लवकरच देशाला…

भारताच्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची सामना सुरू असतानाच गोळ्या घालून हत्या

Posted by - March 15, 2022 0
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप नांगल (वय-३८) याच्यावर गोळीबार करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *