पुतीन यांच्या ‘त्या’ एका निर्णयामुळे तरुणीला फुटला अश्रूंचा बांध

145 0

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मोठमोठ्या कंपन्यांना या युद्धाची झळ बसत आहे. अनेक कंपन्यांनी रशियामध्ये आपले कामकाज पूर्णपणे थांबवले आहे.

यानंतर रशियाकडूनही कठोर पावले उचलली जात आहेत. आता रशियामध्ये इंस्टाग्राम वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

रशियाने सोमवारी १४ मार्चला देशातील जवळपास ८ कोटी वापरकर्त्यांसाठी इंस्टाग्राम बंद केले आहे. हा निर्णय इंस्टाग्रामच्या वापरकर्त्यांसाठी अतिशय धक्कादायक आहे. इंस्टाग्रामवरील रशियन इन्फ्लुएन्सर्सनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांच्या फॉलोवर्ससाठी निरोप संदेश पोस्ट केला आणि त्यांना इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला फॉलो करण्याचे आवाहन केले आहे.

पुतिन यांच्या या निर्णयाचा एका तरुणीला मोठा धक्का बसला असून यातून सावरणे तिला कठीण जात आहे. तिने टेलिग्राम या अ‍ॅपवरून रडत रडत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही तरुणी एक ब्युटी ब्लॉगर आहे. तिने या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “तुम्हीही असाच विचार करता का की इंस्टाग्राम हे केवळ माझ्या उत्पन्नाचा स्रोत आहे? इंस्टाग्राम माझ्यासाठी माझे आयुष्य आहे. माझी आत्मा आहे. यासोबतच मी झोपते आणि उठते. गेली ५ वर्षे मी इंस्टाग्रामचा वापर करत आहे.”

https://twitter.com/nexta_tv/status/1502433817465864198?t=F5JPkLgEb-rGMww4KZe9_Q&s=19

Share This News

Related Post

हिंदुत्वविरोधी पक्षांच्या कटात फसलेल्या ठाकरे सेनेवर आता लाल रंगाची झालर ! , भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचे टीकास्त्र

Posted by - October 13, 2022 0
हिंदुत्व हीच ताकद असलेल्या शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून दूर करण्याचा व्यापक कट हिंदुत्वविरोधी राजकीय नेत्यांनी आखला आहे. कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा हा…

बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन, कसं कराल डाऊनलोड?

Posted by - February 8, 2022 0
पुणे- बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीची परीक्षा 15 मार्च पासून तर बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत आहे. दरम्यान बारावी…

‘माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही’, नितीन गडकरी असे का म्हणाले ?

Posted by - February 19, 2022 0
नागपूर- एवढे महाकाय प्रकल्प पूर्ण करताना माझ्या घरासमोरचा अवघ्या दोन किमीचा रस्ता पूर्ण करू शकलो नाही अशी खंत केंद्रीय रस्ते…

#URFI : आता हे काय ? होळीला उर्फीचा नवा अजब गजब ड्रेस, युझर्स चिडले , ‘आमची होळी खराब करण्याचं धाडस कसं झालं !

Posted by - March 7, 2023 0
‘बिग बॉस ओटीटी’ची स्पर्धक आणि इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे रोज…
Bhandara News

Bhandara News : नातेवाईकाशी बोलण्यासाठी थांबले अन् घात झाला; दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 28, 2023 0
भंडारा : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. भंडारा जिल्ह्यात (Bhandara News ) अशीच एक अपघाताची घटना घडली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *