Petrol Diesel Prices

Petrol Diesel Prices: महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागलं

747 0

मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये थोडी तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजेदरम्यान WTI क्रूड 78.48 डॉलर प्रति बॅरलवर विकलं जातंय. तर ब्रेंट क्रूड 82.52 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलं आहे. देशात तेल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे ताजे दर लागू केले आहेत. भारतात रोज सकाळी 6 वाजता ईंधनाच्या किंमतींमध्ये सुधारणा केली जाते.

महाराष्ट्रात पेट्रोल 79 पैशांनी तर डिझेल 76 पैशांनी महागलं आहे. बिहारमध्ये पेट्रोलच्या दरात 52 पैशांनी तर डिझेलच्या दरात 48 पैशांनी वाढ झाली आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आणि तामिळनाडूमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे गुजरातमध्ये पेट्रोल 38 पैशांनी तर डिझेल 41 पैशांनी स्वस्त झाले आहे. हरियाणामध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नईमध्ये पेट्रोल 102.65 रुपये आणि डिझेल 94.25 रुपये प्रति लिटर

दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात दर
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात आणि नवीन दर जाहीर होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साइज ड्यूटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते.

या प्रकारे तुम्ही जाणून घेऊ शकता दर
पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात. इंडियन ऑइलचे ग्राहक 9224992249 या नंबरवर RSP आणि त्यांचा शहर कोड लिहून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड लिहून 9223112222 या नंबरवर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड टाइप करून आणि 9222201122 या नंबरवर SMS पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

Aaditya Thackeray

Aaditya Thackeray : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

Posted by - November 18, 2023 0
मुंबई : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्याविरुद्ध…
Supriya Sule

Contractual Recruitment : ‘कंत्राटी’ भरतीसंदर्भात ‘त्या नेत्यांचे राजीनामे घ्या’, सुप्रिया सुळेंची फडणवीसांकडे मागणी

Posted by - October 21, 2023 0
मुंबई : कंत्राटी भरतीच्या (Contractual Recruitment) मुद्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय, कारण महाविकास आघाडी सरकारचे पाप आपल्या माथी नको, असं…
Election Commission

Election Commissioner : लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा ! दोन्ही निवडणूक आयुक्तांची झाली नियुक्ती

Posted by - March 14, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीचा (Election Commissioner) मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश कुमार आणि बलविंदर संधू या दोन…

केंद्रीय गुप्तचर यंत्रणेचा अलर्ट; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका ?

Posted by - October 19, 2022 0
नवी दिल्ली : केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे समजते. पाकिस्तान मधील दहशतवादी…
Love Story

Love Story : एक सीमा अशीही! पब्जीमुळे पाकिस्तानी सीमा आणि नोएडाचा सचिन यांची अनोखी प्रेमकहाणी

Posted by - July 14, 2023 0
पाकिस्तानी सीमा आणि नोएडात राहणारा सचिन यांची प्रेमकहाणीची (Love Story) चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे. भारतासह पाकिस्तानातही सीमा हैदर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *