पाकिस्तानी नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल, वृद्धांना थप्पड तर नव्या पंतप्रधानांना शिवीगाळ

428 0

इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये सत्ताबदल झाल्यापासून राजकारण तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यामध्ये नेत्यांमध्ये भांडण झाल्याची चर्चा रंगली आहे. ताजे प्रकरण इस्लामाबादमधील मॅरियट हॉटेलचे आहे, जेथे पीटीआयचे बंडखोर नेते नूर आलम खान, पीपीपीचे सिनेटर मुस्तफा नवाज खोखर, फैसल करीम कुंडी आणि नदीम अफझल इफ्तार पार्टीत उपस्थित असताना काहीजणांमध्ये जोरदार हाणामारी सुरु असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करून त्यांना खाली पाडताना दिसत आहे. यानंतर अनेक लोक मदतीला धावून येतात. पण हा गोंधळ बराच काळ चालतो. मात्र, हा वाद कसा सुरू झाला आणि आधी भांडण कोणी सुरू केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जिओ न्यूजचे रिपोर्टर मुर्तझा अली शाह यांनी हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

https://twitter.com/MurtazaViews/status/1513903017103437847

हल्ल्याशिवाय, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनाही शिवीगाळ केल्याचे आणखी एका व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये पीटीआय नेता फहीम खान शाहबाजला आंतरराष्ट्रीय भिकारी म्हणताना दिसत आहे. ” मी आता संसदेमध्ये उभा असून मी महाल आंतरराष्ट्रीय भिकारी दाखवणार आहे. आणि हे भिकारी आहेत. समाजाला भिकारी म्हणणारे स्वतःच भिकारी आहेत ” असे फहीमने म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. फहीमने देशाच्या पंतप्रधानांसाठी असे शब्द वापरू नयेत, या विधानावर लोक फहीमवर टीका करत आहेत.

विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचे सरकार कोसळले असून शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत. शाहबाज हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत.

 

 

 

 

 

Share This News

Related Post

Chhagan Bhujbal and manoj Jarange

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून… मनोज जरांगेचा मोठा आरोप

Posted by - November 18, 2023 0
सातारा : मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा आज 4 था दिवस आहे. आज ते साताऱ्यात आहेत. यावेळी त्यांनी इस्लामपूर येथील…
The Independent Voice

दिल्लीत प्रेस क्लब ऑफ इंडिया येथे “दि इंडिपेंडंट व्हाइस”चा शुभारंभ!

Posted by - August 8, 2023 0
नवी दिल्ली :- नव्या जमान्याचा डिजिटल पत्रकारिता आदर्श,मूल्य, कायदा आणि गतिमानता या तत्त्वांवर उभी रहावी यासाठी महाराष्ट्रातून सुरु झालेली डिजिटल…

सीमाप्रश्न सुरू असताना मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्याची गरज होती का ? सीमावादाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे आक्रमक 

Posted by - December 26, 2022 0
नागपूर : सीमावादावर सभागृहात चर्चा करण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालंय. याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नी आग्रही भूमिका मांडत…
Mohit Pandey

Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान

Posted by - January 22, 2024 0
अयोध्या : 22 जानेवारीला रामललालाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठापणा (Mohit Pandey) करण्यात येणार आहे. संपूर्ण देश दिवाळी उत्सव करणार आहे. संपूर्ण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *