LIC

LIC कडून बालासोर दुर्घटनेतील पीडितांसाठी जाहीर केल्या अनेक सवलती

385 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसीने (LIC) शनिवारी रात्री सांगितले की, ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दुःखद रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी क्लेम सेटलमेंटला गती आणली जाईल. दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे.

तसेच एलआयसी पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्रांच्या बदल्यात, रेल्वे, पोलीस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल असेदेखील म्हंटले आहे.

काय घडले नेमके?
ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 900 प्रवासी जखमी झाले आहेत तर 200 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाला होता.

Share This News

Related Post

Sangli Crime News

Sangli Crime News : तुझ्याच आठवणीत जगत राहीन, पण पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही; म्हणत तरुणाने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - August 6, 2023 0
सांगली : सांगली (Sangli Crime News) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.यामध्ये सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) शिराळा तालुक्यातील वारणा…

एसटी महामंडळाचे विलीनीकरण नाहीच, विलीनीकरणाचा मुद्दा राज्य सरकारने काढला निकाली

Posted by - March 23, 2022 0
मुंबई- राज्य सरकारने एसटी विलीनीकरणाचा अहवाल मंजूर केला आहे. एसटी महामंडळ विलीनीकरण शक्य नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.…

या चिमुकल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही !

Posted by - October 10, 2022 0
हिंगोली : बळीराजाचं आयुष्य हे मेहनतीतच जास्त जाते आहे. त्यात निसर्गाची अवकृपा सर्वात जास्त बळीराजालाच धक्का देऊन जाते. पोटच्या लेकराला…

भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे ; मुंबईच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची नियुक्ती

Posted by - August 12, 2022 0
मुंबई : अखेर अनेक नावांच्या स्पर्धेमध्ये भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.  चंद्रकांत पाटील यांचा शिंदे…

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने वंदन ; VIDEO

Posted by - September 2, 2022 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनी 15 हजार सामूहिक सूर्यनमस्कारने आज बाप्पाला वंदन केले. लक्ष्मी वेंकटेश…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *