G20 Parishad

G20 Parishad : ‘आता वाजले की बारा…’; मराठमोळ्या गाण्याने नायजेरियाच्या अध्यक्षांचं स्वागत?

686 0

G20 परिषदेच्या (G20 Parishad) बैठकीसाठी नायजेरियाचे अध्यक्ष बोला अहमद तिंनुबा हे भारतात दाखल (G20 Parishad) झाले आहेत. त्यांचे विमानतळावर स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत करतानाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कि, नायजेरियाच्या अध्यक्षांच्या स्वागतावेळी मराठी गाणं लावण्यात आलं होतं. या प्रसंगाचा व्हिडिओ सिद्धांत सिबल या एक्स (ट्विटर) हँडलवरून पोस्ट करण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री एस. पी. सिंह बघेल यांनी पालम येथील लष्करी हवाई अड्ड्यावर बोला यांचं स्वागत केलं. जी-20 शिखर परिषदेमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी कित्येक देशांचे अध्यक्ष येणार आहेत. यांपैैकी सर्वात प्रथम बोला यांचं आगमन झालं आहे.या वेळी नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री युसूफ तुग्गर आणि भारतातील नायजेरियाचे उच्चायुक्त अहमद सुले हेदेखील उपस्थित होते. नवी दिल्लीमध्ये ९ आणि 10 सप्टेंबर रोजी G20 बैठक पार पडणार आहे. या व्हिडिओची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार

Posted by - May 20, 2022 0
वाराणसी- ज्ञानवापी प्रकरणाची सुनावणी आता जिल्हा न्यायालय करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून ज्ञानवापीचा खटला हस्तांतरित करण्यात आला आहे. आता जिल्हा न्यायाधीश…
Thar

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! थेट ‘थार’ ला नांगर जोडून केली नांगरणी

Posted by - June 13, 2023 0
आजकाल शेतीदेखील आधुनिक पद्धतीने करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या पुण्यातील इंदापूरात एका शेतकर्‍याने गजब फंडा आजमावत चक्क थार च्या साथीने…

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - May 13, 2022 0
नवी दिल्ली- परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी…
Love Story

Love Story : अचानक विमानतळावर 78 वर्षांच्या आजोबांना आपल्या शाळेतील क्रश दिसताच त्यांनी उचलले ‘हे’ पाऊल

Posted by - August 2, 2023 0
बालपणी शेजारी राहणारी असो किंवा शाळा असो किंवा कॉलेज असो प्रत्येकाची कोणी ना कोणी क्रश (Love Story) नक्कीच असते. यानंतर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *