NASA चं मून मिशन ‘आर्टेमिस-1’ अवकाशात झेपावलं; काय आहे हा आर्टेमिस प्रकल्प ?

339 0

साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं मून मिशन ‘आर्टेमिस – 1’ अखेर अवकाशात झेपावलं. अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या आर्टेमिस मोहिमेतलं हे पहिलं रॉकेट प्रक्षेपण होतं. या रॉकेटनं अवकाशात प्रक्षेपित केलेलं ओरायन यान आता चंद्राच्या दिशेनं झेपावत आहे. चंद्राला गवसणी घालून हे यान सहा आठवड्यांनी पृथ्वीवर परतणार आहे. नासाचा हा आर्टेमिस प्रकल्प नेमका काय आहे ? जाणून घेऊयात..

फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून हे प्रक्षेपण करण्यात आलं. नासाचा हा तिसरा प्रयत्न आहे. आर्टेमिस-1 ही मोहीम नासाच्या मंगळ मोहिमेनंतरची सर्वात महत्त्वाची मोहीम आहे. अमेरिकेच्या 50 वर्षांपूर्वीच्या अपोलो मिशननंतर प्रथमच अंतराळवीरांना चंद्रावर नेण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये या यानाचं प्रक्षेपण होणार होतं पण काही तांत्रिक कारणं आणि खराब हवामानामुळं ते पुढे ढकललं गेलं. अखेर 16 नोव्हेंबर रोजी या रॉकेटनं अवकाशात झेप घेतली. आता हा आर्टेमिस प्रकल्प नेमका काय आहे हे समजावून घेऊयात… आर्टेमिस-1 मोहिमेदरम्यान, ओरायन आणि एसएलएस रॉकेट चंद्रावर पोहोचेल आणि 42 दिवसांत पृथ्वीवर परत येईल. जर हे मिशन यशस्वी झालं तर 2025 पर्यंत अंतराळवीर चंद्रावर पाठवले जातील. आर्टेमिस-1 मोहिमेनंतरच नासाचे शास्त्रज्ञ चंद्रावर पोचण्यासाठी इतर आवश्यक तंत्रे विकसित करतील. जेणेकरून चंद्राच्या पलीकडं जाऊन मंगळाचा प्रवासही करता येईल.

अमेरिका आपल्या मून मिशन आर्टेमिसच्या माध्यमातून तब्बल 50 वर्षांनंतर पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या तयारीत आहे. ओरायन अंतराळयान मानवाच्या अंतराळ प्रवासासाठी बनवण्यात आलं आहे. एवढा लांब प्रवास करणारं ओरायन अंतराळयान हे पहिलं अंतराळयान असेल. दरम्यान, मुख्य मून मिशनसाठी हे एक चाचणी उड्डाण आहे, ज्यामध्ये एकही अंतराळवीर पाठवला जाणार नाही. या उड्डाणामुळं चंद्राभोवतीची परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे जाणून घेण्याचं शास्त्रज्ञांचं लक्ष्य आहे. चंद्रावर गेल्यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परत येऊ शकतील का ? हे देखील या मोहिमेअंतर्गत पाहण्यात येईल. नासाची ‘स्पेस लॉन्च सिस्टम अर्थात एसएलएस मेगारॉकेट’ आणि ‘ओरायन क्रू कॅप्सूल’ चंद्रावर पोहोचतील. अंतराळवीर सहसा क्रू कॅप्सूलमध्ये राहतात परंतु यावेळी ते रिक्त असेल. हे मिशन 42 दिवस, 3 तास आणि 20 मिनिटांचं आहे, त्यानंतर ते पृथ्वीवर परत येईल. हे यान एकूण 20 लाख 92 हजार 147 किलोमीटर अंतर कापणार आहे.

हे आर्टेमिस मिशन नेमकं काय आहे आणि ते कशासाठी हेही जाणून घेऊयात… आर्टेमिस-1 रॉकेट ‘हेवी लिफ्ट’ आहे आणि त्यात आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली इंजिनं आहेत. हे रॉकेट चंद्राच्या कक्षेत जाईल आणि काही छोटे सॅटेलाईट सोडेल आणि नंतर स्वतःच कक्षेत स्थापित होईल. नासाच्या माहितीनुसार, 2024 च्या आसपास आर्टेमिस-2 लाँच करण्याची योजना आहे. यात काही अंतराळवीरही जातील पण ते चंद्रावर पाऊल ठेवणार नाहीत. या मोहिमेचा कालावधी मोठा असला तरी सध्या अंतराळवीरांची यादी समोर आलेली नाही. यानंतर अंतिम मिशन आर्टेमिस-3 रवाना केलं जाईल. त्यात जाणारे अंतराळवीर चंद्रावर उतरतील. हे मिशन 2025 किंवा 2026 च्या आसपास सुरू केलं जाऊ शकतं. ह्युमन मून या मिशनमध्ये पहिल्यांदाच महिलाही सहभागी होणार आहेत. या मिशनच्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असलेलं पाणी आणि बर्फ यावर संशोधन केलं जाईल.

Share This News

Related Post

इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेले; ‘असा’ घडला घटनाक्रम ?

Posted by - March 3, 2022 0
विधीमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदा राज्यपाल भाषण सोडून गेल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रगीत न होताच राज्यपाल निघून गेले आहेत. सभागृहातील…

Breaking News ! दाढी कटिंग महागली ! सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांची दरवाढ

Posted by - April 20, 2022 0
पुणे- सलून व ब्यूटी पार्लर व्यावसायिकांनी आपल्या सेवेमध्ये दरवाढ केली आहे. व्यावसायिकांच्या राज्यस्तरीय ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या…
Dagdushet Ganpati

Dagdushet Ganapati : ‘दगडूशेठ’ गणपती ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात साकारण्यात येणार अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती

Posted by - June 21, 2023 0
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Dagdushet Ganapati), सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टतर्फे 131 व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त अयोध्येतील…

मोठी बातमी! जॉन्सन बेबी पावडर मुलुंडचा उत्पादन परवाना कायमस्वरूपी रद्द

Posted by - September 18, 2022 0
मुंबई: अन्न व औषध प्रशासन विभागाद्वारे मे. जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या…
Pune Car Accident

Pune Car Accident : पुण्यातून कोकणात जाताना कारचा अपघात; तरुणीसह तिघांचा धरणात बुडून मृत्यू

Posted by - July 29, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune Car Accident) नीरा देवघर धरणाच्या पाण्यात कार कोसळून एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *