Free LPG Connection

Free LPG Connection: मोदी सरकाराचं आणखी एक गिफ्ट! 75 लाख मोफत LPG कनेक्शन देणार

2644 0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधन आणि ओणम सणानिमित्त महिलांना मोठी भेट दिली होती. एलपीजी गॅस सिलेंडरच्या (Free LPG Connection) किंमतीत सरसकट 200 रुपयांची सवलत दिली होती. तर उज्ज्वला योजनेतर्गंत 400 रुपयांची सवलत देण्यात आली. केंद्र सरकारने आता देशातील 75 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. याविषयीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटी रुपयांचा भार पडणार आहे.

1,650 कोटींचा तिजोरीवर भार
मंत्रीमंडळाने आज पंतप्रधान उज्ज्वला योजनेतंर्गत हे नवीन मोफत गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन वर्षांत या गॅस कनेक्शनची जोडणी करण्यात येणार आहेत. 75 लाख एलपीजी कनेक्शन देण्यात येणार आहे. यामुळे सरकारच्या तिजोरीवर 1,650 कोटींचा बोजा पडणार आहे.

उज्ज्वला योजना 2.0 चा फायदा कोणाला होणार?
1) PMUY वेबसाइटनुसार, गरीब कुटुंबातील प्रौढ महिला ज्यांच्या घरात LPG कनेक्शन नाही ती उज्ज्वला 2.0 योजनेअंतर्गत पात्र मानली जाईल. या योजनेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्याही एका श्रेणीतील असणे आवश्यक आहे.
2) सामाजिक-आर्थिक आणि जात जनगणना 2011 अंतर्गत समाविष्ट महिला यासाठी पात्र असतील.
3) अनुसूचित जाती/अनुसूचित जमातीचे लोक, प्रधानमंत्री आवास योजना, अंत्योदय अन्न योजना, वनवासी, सर्वात मागासवर्गीय, पूर्वीच्या चहाच्या बागेतील जमाती, नदी बेटांवर राहणारे लोक (लाभार्थी आवश्यक सहाय्यक कागदपत्रे सादर करतील).
4) जर एखादी महिला वरील दोन श्रेणींमध्ये येत नसेल, तर ती गरीब कुटुंबांतर्गत लाभार्थी असल्याचा दावा करू शकते.

Share This News

Related Post

crime

धक्कादायक ! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - May 15, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये लिफ्टचा दरवाजा अचानक…

अबब ! राज्यात सर्वाधिक बोगस शिक्षक ; जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक बोगस शिक्षक

Posted by - March 16, 2022 0
नाशिक- आरोग्य परीक्षा, म्हाडा परीक्षा आणि आता टीईटी (TET) शिक्षक भरती गैरव्यवहार प्रकरणाने राज्यातील पालकांची झोप उडाली आहे. पुणे पोलिसांनी…

धक्कादायक : धुळ्यात अवघ्या 3,400 रुपयांच्या वादातून 39 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
धुळे : धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळ जनक…

मोठी बातमी! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास ठराव

Posted by - December 29, 2022 0
नागपूरमध्ये विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन शेवटच्या टप्प्यात आहे.अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच आता महाविकास आघाडीने राहुल नार्वेकरांविरोधात अविश्वास…

महाराष्ट्रातील 70 वर्षांपूर्वीचा खटला न्यायालयात आजतागायत प्रलंबित; आरोपी आता जिवंत आहे की नाही त्याचाही नाही उल्लेख ! नेमका खटला काय आहे ?

Posted by - January 11, 2023 0
न्यायदानाला विलंब म्हणजे अन्याय असं म्हंटल जातं. पण असं असलं तरी देशातील विविध न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत. देशातील सर्वात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *