DK Shivkumar

Karnataka Election Results 2023 : निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचे किंगमेकर डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर (Video)

316 0

बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता राखली आहे. काँग्रेसच्या या विजयात शिल्पकार म्हणून डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांना ओळखले जाते. या विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे किंगमेकर डीके शिवकुमार यांना अश्रू अनावर झाले. तसेच त्यांनी या विजयाचे श्रेय कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेत्यांना दिले आहे.

काय म्हणाले डीके शिवकुमार ?
काँग्रेसच्या विजयानंतर डीके शिवकुमार म्हणाले मी आपल्या कार्यकर्ते आणि पक्षातील सर्व नेत्यांना या विजयाचं श्रेय देत आहे. ज्यांनी पक्षासाठी मेहनत केली आणि काम केलं. आज लोकांनी खोट्याचा पर्दाफाश केला आहे. मी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांना विजय होणार असं आश्वासन दिलं होतं. मी हे विसरू शकत नाही, सोनिया गांधी या मला भेटायला जेलमध्ये आल्या होत्या, त्यावेळी मी पदावर राहण्यापेक्षा जेलमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यावेळी पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला, असे म्हणत शिवकुमार यांना आपले अश्रू अनावर झाले.

कोण आहे डिके शिवकुमार?
डीके शिवकुमार कर्नाटकमधील काँग्रेसचे मोठे नेते आहेत. कनकपूरा सीटमधून सातत्याने 8 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या निवडणुकीत त्यांनी फक्त एक दिवस प्रचार केला आणि ते 1 लाखांच्या फरकाने विजयी झाले. त्यामुळे सतत 8 वेळा आमदार झालेले डीके कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News

Related Post

शिवसेना नेते,माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

Posted by - June 5, 2022 0
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडाचे शिवसेनेचे आमदार माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून…

Gujarat Assembly Elections : गुजरात विधानसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची घोषणा, ‘या’ दिवशी निवडणून, वाचा सविस्तर

Posted by - November 3, 2022 0
गुजरात : 1 आणि 5 डिसेंबरला गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे 25 वर्ष…
Amit Shah

Three New Criminal Laws : देशात 1 जुलैपासून लागू होणार ‘हे’ 3 नवे कायदे

Posted by - February 24, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी, गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी केंद्र सरकारने 3 नवे कायदे (Three New Criminal Laws)…

राहुल गांधी यांच्या वायनाडमध्ये पोटनिवडणूक होणार का ? काय म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त ?

Posted by - March 29, 2023 0
सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवलं आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने कारवाई करत…
Ramdas Aathavle and prakash Ambedkar

Ramdas Athawale : अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांसाठी सोडली; रामदास आठवले यांचे मोठे वक्तव्य

Posted by - January 15, 2024 0
वाशिम : देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकांचे (Ramdas Athawale) वारे वाहू लागले आहेत. सर्वच पक्षांनी लोकसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभेसाठी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *