Chandrayaan-3

Chandrayaan-3 : विजयी भव: चंद्र भेटीची घटिका आली समीप ! इस्रोचे नवीन ट्विट

1059 0

भारताच्या चांद्रयान -3 (Chandrayaan-3) मोहिमेकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 14 जुलैला सुरू झालेली ही मोहीम आता यशाच्या अंतिम टप्प्यात आहे. विक्रम लँडर प्रत्यक्षात चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतानाचा क्षण आणि त्यानंतरच्या कामगिरीची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

चांद्रयान 3 मोहीम सुरू झाल्यापासून अनेक अवघड टप्पे या मोहिमेने पूर्ण केले आहेत. आता अखेरचा महत्त्वाचा टप्पा आज पूर्ण होणार आहे. चंद्रावर लँड होणाऱ्या लँडर साठी शेवटची 15 मिनिटे खूप महत्त्वपूर्ण असतील. यावेळी लँडर चंद्राच्या सर्वात जवळ पोहोचेल. विक्रम लँडर स्वतःच लँडिंगची जागा शोधणार आहे.

इस्रोने ट्विट करून नुकतीच माहिती दिली आहे की संध्याकाळी 5 वाजून 44 मिनिटांनी लँडिंग प्रक्रिया सुरू होणार आहे. चांद्रयान 3 च्या लँडिंगच काऊंटडाउन सुरू झालं आहे. चांद्रयान वातावरणातील बाबी तपासून लँडिंग करणार आहे.. इस्रोचे शास्त्रज्ञ बंगळूर मधील कमांड सेंटर मध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत.

चांद्रयानच्या यशस्वी लँडिंग नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. आज भारतात अनेक ठिकाणी चांद्रयान 3 चे लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे. संपूर्ण भारत आज चंद्रमय झालेला आहे.

Share This News

Related Post

#कसबा पोटनिवडणूक : कसबा पेठ मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण

Posted by - February 22, 2023 0
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघ पोटनिवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयात करण्यात…

बालासोर जिल्ह्यात कोरोमंडल आणि दुरांतो एक्स्प्रेसची समोरासमोर टक्कर

Posted by - June 2, 2023 0
ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले…

विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल : मतमोजणीचे विद्यापीठाकडून सूक्ष्म नियोजन; खाशाबा जाधव क्रीडासंकुलात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी

Posted by - November 22, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्व तयारी…

शाळांच्या वेळेबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या ; शिक्षण आयुक्तांच्या सूचना

Posted by - April 9, 2022 0
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना…

“चोर सोडून संन्याशाला फाशी” पुणे मनपाचा अजब कारभार ! मिळकतकर थकबाकीदाराचा फ्लॅट सापडला नाही म्हणून तिसऱ्याचीच सदनिका केली सील

Posted by - February 20, 2023 0
पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने कर संकलन विभागाच्या मिळकत कर गोळा करण्याच्या साठी वर्षा अखेर म्हणून जोरदार मोहीम राबविण्यात येते…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *