PSLVC-56

ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण

650 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो 30 जुलै रोजी 6 सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेसाठी इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) चे सहकार्य घेणार आहे.

30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण
इस्रो 30 जुलैला PSLV-C56 सह सहा सहप्रवासी उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. इस्रोने या संदर्भात माहिती दिली आहे. PSLV-C56 सह सहा सह-प्रवासी उपग्रह 30 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता प्रक्षेपित केले जाणार आहेत. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण पार पडणार आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

भारत आणि सिंगापूरची संयुक्त मोहीम
PSLV-C56 ही भारत आणि सिंगापूर यांच्यातील संबंधाना बळ देणारी मोहीम ठरणार आहे. DS-SAR उपग्रह सिंगापूर सरकारच्या अंतर्गत सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान एजन्सी (DSTA) आणि ST अभियांत्रिकी यांच्या भागीदारीमधून तयार करण्यात आला आहे. PSLV-C56 द्वारे सहा सह-प्रवासी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार आहेत. या उपग्रहांमध्ये वेलॉक्स-एएम (Velox-AM), आर्केड (Arcade), स्कूब-II (Scoob-II), न्यूलायन (NewLion), गॅलासिया-2 (Galacia-2) आणि ओआरबी-12 स्ट्राइडर (ORB-12 Strider) यांचा समावेश आहे.

Share This News

Related Post

जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्रात झाले 29 हजार अपघात; नवीन वर्ष अपघात मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प

Posted by - December 31, 2022 0
पुणे : आगामी नूतन वर्षाचे स्वागत करताना महाराष्ट्र अपघात मुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच मानसोपचार तज्ञ यांनी…

शैक्षणिक बातमी : शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांसह वह्या देखील मिळणार मोफत

Posted by - November 7, 2022 0
शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबत विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं देखील कमी करण्यासाठी सध्या शिक्षण खातं काही योजनांचा विचार करते आहे. त्यात…

#BHAGATSINHA KOSHYARI : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हायकोर्टाची नोटीस; आता पुन्हा काय घडलं ? वाचा सविस्तर

Posted by - January 31, 2023 0
महाराष्ट्र : काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महापुरुषांच्या बाबत केलेल्या अवमानकारक वक्तव्यावरून राज्याचे वातावरण प्रचंड तापले होते. त्यानंतर भगसिंह…

शिंदे-फडणवीस सरकारचा ‘मास्टरस्ट्रोक’; शिवप्रताप दिनीच अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

Posted by - November 10, 2022 0
सातारा: अफजलखानाच्या कबरीजवळ असलेले अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरवात करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई सुरू आहे.…
Pulwama News

Pulwama News : पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 1 दहशतवादी ठार

Posted by - April 11, 2024 0
पुलवामा : जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर (Pulwama News) आली आहे. दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात गुरुवारी सकाळपासून चकमक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *