ISRO Naughty Boy INSAT-3DS

ISRO Naughty Boy INSAT-3DS : इस्रो आज रचणार इतिहास! अंतराळात पाठवणार ‘नॉटी बॉय’

1503 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंद्रयान आणि सूर्ययानानंतर आता इस्रो आणखी एक इतिहास रचण्याच्या तयारीत आहे. चंद्रयान आणि सूर्ययानानंतर इस्रो आणखी एका मिशनच्या (ISRO Naughty Boy INSAT-3DS) तयारीत आहे. आज हे मिशन पार पडणार आहे. इस्रो आज नॉटी बॉय अंतराळात पाठवणार आहे. इस्रोचं हा INSAT-3DS उपग्रह आज प्रक्षेपित होणार आहे. INSAT-3DS हा हवामानाची अचूक माहिती देणारा उपग्रह असून त्याला ‘नॉटी बॉय’ असं टोपणनाव देण्यात आलं आहे.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार GSLV-F14 शनिवारी संध्याकाळी 5.35 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून उड्डाण करेल. हे लिफ्ट-ऑफ झाल्यानंतर अंदाजे 20 मिनिटांनी जिओसिन्क्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट (GTO) मध्ये तैनात केलं जाईल. हे रॉकेटचे एकूण सोळावं मिशन असेल आणि स्वदेशी विकसित क्रायोजेनिक इंजिन वापरून त्याचं दहावं उड्डाण असेल.

‘नॉटी बॉय’ या उपग्रहाची माहिती
‘नॉटी बॉय’चं वजन 2274 किलो आहे.51.9 मीटर लांबीचे हे रॉकेट इमेजर पेलोड, साउंडर पेलोड, डेटा रिले ट्रान्सपॉन्डर आणि सॅटेलाइट एडेड सर्च आणि रेस्क्यू ट्रान्सपॉन्डर घेऊन जाईल. ढग, धुके, पाऊस, बर्फ आणि त्याची खोली, आग, धूर, जमीन आणि महासागर यावर संशोधन करण्यासाठी याचा वापर केला जाईल. एकदा कार्यान्वित झाल्यानंतर हा उपग्रह पृथ्वी विज्ञान, हवामानशास्त्र विभाग (IMD), नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT), हवामान अंदाज केंद्र आणि भारतीय राष्ट्रीय केंद्र अंतर्गत विविध विभागांसाठी काम करेल.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Manchar Accident : मंचर जवळ कार-टेम्पो-कंटेनरच्या भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ प्रकरणात मोठी अपडेट; अखेर ‘त्या’ आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश

Ahmednagar News : कुटुंब हळहळलं ! वन रक्षक विभागाची लेखी परीक्षा उत्तीर्ण झाली, पण सरावादरम्यान घडली दुर्दैवी घटना

Share This News

Related Post

कोरोना लसीचा बूस्टर डोस घेणाऱ्यांसाठी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Posted by - May 13, 2022 0
नवी दिल्ली- परदेशात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दुसरा डोस आणि बुस्टर डोस यामधील अंतर ९ महिन्याहून कमी करत ते ९० दिवसापर्यंत कमी…
Accident News

Accident News : भरधाव ट्रक दुकानांत घुसल्याने भीषण अपघात; 3 ठार

Posted by - December 17, 2023 0
कानपूर : कानपूर आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी रात्री भीषण अपघात (Accident News) झाला आहे. यामध्ये दगड वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण…
Terror Attack In Sydney

Terror Attack In Sydney : सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला ! अनेक लोकांनी गमावला जीव

Posted by - April 13, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला (Terror Attack In Sydney) झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनेक लोकांचा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *