ISRO

इस्रोतर्फे नॅविगेशन सॅटेलाईटचे यशस्वी लाँचिंग; आता भारताला जगावर लक्ष ठेवता येणार

496 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने (ISRO) सोमवारी (29 मे) रोजी जीपीएस प्रणालीच्या (GPS) सेवेमध्ये वाढ करण्यासाठी आधुनिक पिढीच्या आंतराळयानाचे (Satelite) प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून जीएसएलव्ही एफ- 12 (GSLV-F12)या रॉकेटमधून एनवीएस-1 (NVS-1) या उपग्रहाने अंतराळात भरारी घेतली आहे. GSLV-F12 माध्यमातून हे उपग्रह अंतराळात सोडण्यात आलं आहे. या उपग्रहाचे वजन दोन हजार 332 किलो इतके आहे.

दोन हजारांपेक्षा अधिक वजन असणाऱ्या एनवीएस-01 या उपग्रहामुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. या उपग्रहाची प्रक्षेपण चाचणीदेखील यशस्वी झाली आहे. एनवीएस-1 या प्रणालीमुळे भारताची नेव्हिगेशन प्रणाली अधिक सक्षम होणार आहे. तसेच हा उपग्रह सीमेवर लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे पाकिस्तान (Pakistan) आणि चीनला (China) मोठा धक्का बसणार आहे.

NAVIC म्हणजे काय?
इस्रोकडून विकसित करण्यात आलेली (NAVIC) ही स्वदेशी नेव्हिगेशन उपग्रह प्रणाली आहे. हा सात उपग्रहांचा समूह असून, अंतराळात ग्राऊंड स्टेशन म्हणून हे काम करेल. ही प्रणाली देशातील सामान्य नागरिकांपासून ते सैन्याच्या जवानांपर्यंत सर्वांना रणनिती ठरवण्यासाठी नेव्हिगेशन प्रणाली म्हणून काम करणार आहे.या उपग्रहामुळे भारत आणि आजूबाजूच्या जवळपास 1500 किलोमीटरचे क्षेत्र हे भारताच्या निरिक्षणाखाली येण्यास मदत होणार आहे.

Share This News

Related Post

हनुमान चालीसा पठण व महाआरतीला अनुउपस्थित राहणार ? पाहा… काय म्हणाले वसंत मोरे

Posted by - April 15, 2022 0
पुणे- गुढीपाडवा मेळावा व उत्तर सभेत मशिदींवरील भोंग्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर येत असून…

पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

Posted by - April 3, 2022 0
पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित…
Bribe

Bribe : लाच घेताना पकडल्याने महसूल अधिकाऱ्याने तोंडात कोंबल्या नोटा, Video व्हायरल

Posted by - July 25, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये लोकायुक्तांच्या पथकाने एका महसूल…

#PUNE : सावित्रीबाई फुले सन्मान 2023 च्या गौरवमुर्तींची नावे विद्यापीठाकडून जाहीर

Posted by - March 14, 2023 0
पुणे : विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या कर्तबगार महिलांना दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून गौरविण्यात येते. यंदा २०२३ च्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *