Chandrayaan 3

Chandrayaan 3 : जब तक सुरज चांद रहेगा; तब तक चांद्रयान 3….; ISRO ची मोठी घोषणा

1419 0

भारताची चांद्रयान 3 (Chandrayaan 3) मोहीम पूर्ण झाली असून, यशस्वी ठरली आहे.विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने आपलं काम यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. सध्या दोघेही डिअ‍ॅक्टिव्ह म्हणजेच झोपेत आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचा प्रयत्न सुरु राहणार आहे. जर दोघांना जाग आली तर उत्तम, अन्यथा कोणतंही नुकसान होणार नाही. त्यामुळे आपल्याला वाईट वाटण्याचं काही कारण नाही असं इस्रोचे प्रमुख डॉक्टर एस सोमनाथ म्हणाले आहेत.

काय म्हणाले डॉ. एस सोमनाथ?
प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरला जे काम देण्यात आलं हे, ते आता पूर्ण झालं आहे. त्यामुळे जर आता ते झोपेतून जागे झाले नाहीत तरी वाईट वाटण्याचं काही कारण नाही. चांद्रयान 3 मोहीम यशस्वी ठरली आहे. जर रोव्हर आणि लँडरचे सर्किट डॅमेज झाले नसतील तर प्रज्ञान आणि विक्रमला पुन्हा जागं करण्यात आलं असतं. कारण शिवशक्ती पॉईंटवर तापमान उणे 200 डिग्री सेल्सिअसच्या खाली पोहोचलं आहे. तसं तर सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत चांद्रयान 3 चंद्रावर उपस्थित राहणार आहे असे ते म्हणाले.

इस्रोच्या प्रमुखांनी आता प्रज्ञान आणि विक्रम जागे झाले नाहीत तर काही अडचण नाही असं म्हटलं आहे. लँडर रोव्हर आणि प्रज्ञान रोव्हरला जी जबाबदारी देण्यात आली होती, ती दोघांनी पूर्ण केली आहे. दोघांना पुन्हा जागं करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील रात्र होईपर्यंत त्यांना जागं करण्याचे प्रयत्न सुरु राहणार आहेत. मात्र तिकडून कोणताही रिस्पॉन्स येताना दिसत नाही आहे. ISRO लवकरच आपल्या पुढील मोहिमेची घोषणा करणार आहे.

Share This News

Related Post

मानवाधिकारांवर जयशंकर यांनी अमेरिकेला दिले सणसणीत प्रत्युत्तर

Posted by - April 14, 2022 0
वॉशिंग्टन- अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात शीखांवर सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांदरम्यान भारताच्या कथित मानवाधिकार उल्लंघनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अमेरिकेला भारताचे परराष्ट्र मंत्री…
Crime News

Crime News : दवाखान्यात घुसला अन् डॉक्टर दाम्पत्यावर… संपूर्ण परिसर हादरला

Posted by - October 1, 2023 0
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा या ठिकाणी एक खळबळजनक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने डॉक्टर…

अधिवेशनात रवी राणा यांचा आक्रमक पवित्रा, “मला बोलूद्या नाही तर मी फाशी घेईन”

Posted by - March 7, 2022 0
शाई फेक प्रकरणात राणा यांना अटक होणार होती मात्र न्यायालयाने राणा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. यानंतर आयुक्त…

धक्कादायक : हा व्हिडिओ पाहिल्यावर अंगावर काटा येईल ; स्कूलबस ड्रायव्हरला त्या प्रकारानंतर केले निलंबित

Posted by - September 27, 2022 0
शाळेत बसने किंवा व्हॅनने जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबत आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अपहरण ,शारीरिक अत्याचार ,अपघात ,आग…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *