Train Viral Video

Train Viral Video : ट्रेनमधली वीज गेल्याने संतापलेल्या प्रवाशांनी थेट टीसीला टॉयलेटमध्येच बंद केलं

679 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेचा (Train Viral Video) प्रवास हा केवळ एक प्रवास नाही तर आयुष्यभराचा अनुभव असतो. हा अनुभव आयुष्यभर आपल्यासोबत जोडला जातो. हा अनुभव कधी सुखद असतो तर कधी वाईट असतो. दिल्लीतल्या (Train Viral Video) आनंदविहारवरुन उत्तर प्रदेशमधल्या गाझीपूरला जाणाऱ्या सुहेलदेव सुपरफास्ट ट्रेनमध्ये प्रवाशांना एक वेगळाच अनुभव पाहायला मिळाला. दिल्लीतल्या आनंद विहार टर्मिनलवरुन सुहेलदेव सुपरफास्ट एक्स्प्रेस निर्धारित वेळेत उत्तरप्रदेशमधल्या गाझीपूरसाठी रवाना झाली. मात्र काही अंतर पार केल्यानंतर ट्रेनमधली वीज गेली त्यामुळे ट्रेनमधला एसीही बंद पडला.

एसी बंद झाल्याने ट्रेनमधील लहान मुलं, महिला आणि वृद्धांना त्रास जाणवू लागला. गर्मीमुळे प्रवाशांची वाईट अवस्था झाली. प्रवासी संतप्त झाले. प्रवाशांनी आपला सगळा राग ट्रेनमधल्या टीसीवर काढला. तब्बल दोन तास सुहेलदेव एक्स्प्रेस एकाच जागेवर उभी होती. त्यामुळे प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी टीसीला जाब विचारायला सुरुवात केली. टीसीने तांत्रिक कारणामुळे वीज गेल्याचं सांगितलं. पण संतप्त प्रवासी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही प्रवाशांनी टीसीची कॉलर पकडून त्याला थेट ट्रेनच्या टॉयलेटमध्येच बंद केलं.

या प्रकरणाची माहिती रेल्वे (Train Viral Video) पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांचं एक पथक सुहेलदेव एक्स्प्रेसमध्ये दाखल झालं. पण यानंतरही प्रवाशांचा उद्वेग कायम होता. अखेर रेल्वे अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी युद्ध पातळीवर तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे आदेश दिले. पण या सर्व गोंधळात बराच वेळ केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Share This News

Related Post

Maruti Navle

Maruti Navale : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवलेंवर गुन्हा दाखल

Posted by - November 29, 2023 0
पुणे : पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूटचे संस्थापक मारुती नवले (Maruti Navale) यांच्यावर पुणे पोलिसांनी फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नवले…
Yavatmal News

Yavatmal News : दुहेरी हत्याकांडाने यवतमाळ हादरलं ! सज्जनगड मठात आढळले दोन मृतदेह

Posted by - August 29, 2023 0
यवतमाळ : यवतमाळमध्ये (Yavatmal News) दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. या घटनेमुळे (Yavatmal News) संपूर्ण यवतमाळ हादरलं आहे. यवतमाळच्या खानगाव…
Sharad Mohol

Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा उपचारादरम्यान मृत्यू

Posted by - January 5, 2024 0
पुणे : आताच हाती आलेल्या माहितीनुसार कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजत आहे. कुख्यात गुंड…
Cyclone

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने धारण केले रौद्र रुप; 24 तासांत भारताच्या किनारपट्टीवर धडकणार

Posted by - June 14, 2023 0
देशभरात बिपरजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy Cyclone) परिणाम पाहायला मिळत आहे. या बिपरजॉय चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण केलं आहे. या चक्रीवादळामुळे…
Nashik News

Nashik News : संतापाच्या भरात लिव्ह-इन पार्टनरकडून महिलेची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

Posted by - August 17, 2023 0
नाशिक : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये (Nashik News) आरोपीने संतापाच्या भरात आपल्या लिव्ह…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *