Gujrat News

Gujrat News : तीन वर्षांच्या आतील मुलांना शाळेत पाठविणे बेकायदेशीर; उच्च न्यायालयाने पालकांना दिली तंबी

447 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 3 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांना पुर्वप्राथमिक शाळेत पाठविणाऱ्या पालकांची कृती बेकायदेशीर असल्याचे गुजरात उच्च न्यायालयाकडून (Gujrat News) सांगण्यात आले आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार वयाच्या तीन वर्षांनंतरच विद्यार्थ्यांना पुर्व प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकतो, असे गुजरात न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधील काही पालकांनी शाळेतील प्रवेशाच्या वयाबाबत न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी वयाची किमान सहा वर्षे पूर्ण असावीत, या सरकारच्या नोटिफिकेशनला पालकांनी याचिका दाखल करून विरोध केला होता. त्यावर सुनावणीवेळी न्यायालयाने पालकांना आरटीई कायद्याचा आधार घेत फैलावर घेत याचिका फेटाळून लावल्या होत्या. मुख्य न्यायमुर्ती सुनिता अगरवाल आणि न्यायमुर्ती एन.व्ही.अंजारिया यांनी नुकत्याच या याचिका फेटाळून लावल्या आहेत.

उच्च न्यायालयात याचिका केलेल्या पालकांनी आपल्या मुलांना वयाची तीन वर्षे पुर्ण होण्याआधीच पुर्व प्राथमिक शाळेत दाखल केले होते. गुजरातमध्ये 18 फेब्रुवारी 2012 पासून आरटीई नियमांची अंलबजावणी सुरू झाली आहे. या नियमांचे पालकांनी उल्लंघन केले आहे. त्यांनी न्यायालयामध्ये वयाची सहा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांना इयत्ता पहिलीत प्रवेशासाठी परवानगी देण्याची मागणी केली होती. या मुलांनी पुर्व प्राथमिक शाळेत तीन वर्षे पुर्ण केली आहेत, त्यामुळे त्यांना पहिलीत प्रवेश मिळावा, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, न्यायालयाने आरटीई कायद्यातील नियमांचा उल्लेख करत सर्व याचिका फेटाळून लावल्या.

Share This News

Related Post

Filmfare Awards 2024

Filmfare Awards 2024 : ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपट

Posted by - January 28, 2024 0
चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ‘फिल्मफेअर.’ गुजरातमधील गांधी नगर येथे फिल्मफेअर पुरस्कार 2024 (Filmfare Awards 2024) चे आयोजन…
Gas Cylinder

Gas Cylinder : गुडन्यूज! गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात

Posted by - April 1, 2024 0
मुंबई : एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या (Gas Cylinder) किंमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. देशातील चार महानगरांमध्ये गॅसचे…
Sex

शारीरिक संबंधांना खेळ म्हणून मिळाली मान्यता; ‘या’ देशात पार पडणार पहिली सेक्स चॅम्पियनशिप

Posted by - June 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वीडनमध्ये (Sweden) शारीरिक संबंधांना (Physical Relationship) खेळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर…
Cauhan Death

खळबळजनक ! वाळू माफियांनी पोलिसाला ट्रॅक्टरखाली चिरडलं

Posted by - June 16, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कर्नाटक राज्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये राज्यातील कलबुर्गी या ठिकाणी गुरूवारी सायंकाळी…

महागाईपासून लोकांना वाचविण्याची गरज – राहुल गांधी

Posted by - March 19, 2022 0
आगामी काळात महागाई आणखी वाढेल, असा इशारा काँग्रेस  नेते राहुल गांधी  यांनी शनिवारी जनतेला दिला आहे. सरकारने जनतेला महागाईपासून वाचवावे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *