लाऊडस्पीकरवर मोठ्या आवाजात आरती लावल्याने दोघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू तर एक गंभीर

435 0

मेहसाणा- भोंग्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलेले असताना आता याचे पडसाद गुजरातमध्ये उमटले आहेत. मंदिरात लाऊड स्पीकरवर आरती लावल्याने दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर आहे. ही घटना मेहसाणा जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी ७ वाजता घडली.

जसवंतजी ठाकोर असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर त्याचा भाऊ अजित ठाकोर गंभीर आहे. याप्रकरणी जसवंतचा मोठा भाऊ अजित ठाकोर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

जोतना तालुक्यातील लक्ष्मीपुरा गावात बुधवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास दोघे भाऊ घराशेजारीच असलेल्या मेल्डी माता मंदिरात आरती करत होते . लाऊडस्पीकरवर आरती सुरू होती. त्यावेळी सदाजी ठाकोर , विष्णूजी ठाकोर , बाबूजी ठाकोर , जयंती ठाकोर, जावन ठाकोर आणि विनुजी ठाकोर तिथे पोहोचले. इतक्या मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर आरती का लावली आहे, अशी विचारणा त्यांनी केली. आम्ही आरती करत आहोत, असं उत्तर अजित ठाकोर यांनी दिलं.

त्यानंतर सदाजी ठाकोर यांनी शिवीगाळ सुरू केली. अजित ठाकोर यांनी विरोध करताच सदाजी यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना बोलावलं. त्या सगळ्यांनी जसवंत आणि अजित यांच्यावर काठ्यांनी हल्ला केला. अचानक झालेल्या हल्ल्यात दोघे भाऊ जखमी झाले. त्यांना गंभीर अवस्थेत मेहसाणातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे जसवंतचा मृत्यू झाला. पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुणे पोलिसांनी गुडलक कॅफेजवळ पाच कोटीं किंमतीची व्हेल माशाची उलटी केली जप्त

Posted by - September 3, 2023 0
पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या (Pune News) घटनांमध्ये रोज वाढ होताना दिसत आहे. आज पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी कारवाई करत…
Drink Girl Video

Drink Girl Video : दारूच्या नशेत तरुणीचे भररस्त्यात पोलीस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन; लोकांनी व्यक्त केला संताप

Posted by - August 8, 2023 0
लोक दारूच्या नशेत काय करतील आणि काय नाही? याचा काही नेम नाही. काही लोक दारूच्या नशेत रस्त्यावर हुल्लडबाजी (Drink Girl…
Solapur News

Solapur News : सोलापूर हादरलं ! पत्नी आणि मुलाची हत्या करुन शिक्षक पतीची आत्महत्या

Posted by - November 28, 2023 0
सोलापूर : सोलापूरच्या (Solapur News) बार्शी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीने शिक्षक पत्नी आणि…

पुणे : डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानाला आग

Posted by - October 17, 2022 0
पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चॅम्पियन स्पोर्ट्स दुकानात आज सकाळी आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे…

MIT World Peace University : १२ व्या भारतीय छात्र संसदेचा उद्घाटन समारंभ

Posted by - September 14, 2022 0
पुणे : भारतीय छात्र संसद फाऊंडेशन, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *