Kohinoor Diamond

अखेर! कोहिनूर हिर्‍याबाबतची ‘ती’ गोष्ट ब्रिटननं केली मान्य

682 0

कोहिनूर हिऱ्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. कोहिनूर हिरा जेवढा मौल्यवान आणि अद्वितीय आहे तेवढाच तो वादग्रस्तही राहिला आहे. कोहिनूर हा मौल्यवान हिरा एकेकाळी भारताचा होता. त्यामुळे तो भारताला मिळावा म्हणून वारंवार मागणी केली जाते. अशात आता कोहिनूर हिरा लुटल्याचं ब्रिटनने मान्य केले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोहिनूर हिरा आणि अनेक वस्तू ब्रिटनकडून परत मिळवण्यासाठी स्वतःलाच वचन दिल्याचे समोर आले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
ब्रिटनच्या टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या राजघराण्याशी संबंधित प्रदर्शन सुरु आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या कोहिनूर हिऱ्याबद्दलच्या माहितीत पंजाबचे तत्कालीन महाराज दिलीप सिंग यांना इस्ट इंडिया कंपनीनं कोहिनूर हिरा देण्यास भाग पाडले होते. या घटनेच्या वेळी त्यांचं वय 10 वर्षं होते असं त्यात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा मजकूर बकींगहॅम पॅलेस रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या मान्यतेनंतर प्रदर्शनात मांडला गेला आहे. दुसरीकडे वसाहतवादी काळात तत्कालीन ब्रिटिशांनी भरतातून लुटलेल्या कोहिनूरसह अन्य मौल्यवान आणि प्रतीकात्मक चीजवस्तू पूर्ववत ताब्यात मिळाव्यात म्हणून मोदी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत.

महाराजा दिलीप सिंग यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर दिला तेव्हा त्यांच्या मातोश्री कंपनीकडे कैद होत्या.1849 मध्ये इंग्रजांनी दिलीप सिंग यांच्याकडून पंजाबातील लाहोर म्हणजेच सध्याचा पाकिस्तान याला ताब्यात घेतलं होते. लाहोर करारानुसार दिलीप सिंग यांनी कोहिनूर हिरा कंपनीच्या सुपूर्द करावा यासाठी अशी अट घालण्यात आली होती. अर्थातचं आई सुरक्षित हवी असेल तर…. कोहिनूरवरील एक लघुपटही प्रदर्शनात दाखवण्यात आला.

Share This News

Related Post

सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; सदावर्ते यांच्या अंगावर फेकली काळी शाई; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 26, 2022 0
सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद…
Rape

पुण्यात सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Posted by - May 20, 2023 0
पुणे : बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी गेलेल्या महिलेचा मोबाईल हिसकावून घेऊन त्यांच्याबरोबर गैरवर्तन करणार्‍या महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचे (Maharashtra…

राज ठाकरे यांची पुण्यात ‘या’ दिवशी सभा, सभेच्या परवानगी बाबत गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले

Posted by - May 17, 2022 0
पुणे- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय पुणे दौऱ्यावर आहेत. अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांची पुण्यात सभा होणार…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येत दाखल; असा असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा

Posted by - April 9, 2023 0
अयोध्या राज्यात झालेल्या अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील मंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदार खासदारांसह अयोध्या दौऱ्यावर गेले असून आज मुख्यमंत्री…

फरार मेहुल चोक्सीच्या नाशिक येथील जमिनीवर आयकर विभागाची टाच

Posted by - April 18, 2022 0
नाशिक- पीएनबी घोटाळ्यातील आरोपी फरारी हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी जवळील मुंढेगावात असलेल्या बळवंत नगर मधील 9 एकर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *