election-voting

ईव्हीएममध्ये कॅमेरा?… बोटाला शाईही नाही?… कधीपासून होणार बदल…

359 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बोगस मतदान (Bogus voting) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) एक नवीन शक्कल लढवण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर आपल्या बोटावर शाईने (ink) खूण केली जाते. त्यामुळे ही शाई पुसून लोक बोगस मतदान करत होते. यावर आता निवडणूक आयोगाकडून एक पर्याय शोधण्यात आला आहे. मतदान केल्यानंतर बोटावर शाईने खूण करण्याऐवजी लेझरने (laser) खूण केली जाणार आहे. त्यामुळे लोकांना लेझरने केलेली खूण लगेच पुसणे शक्य होणार नाही. ही खूण अनेक दिवस बोटावर राहील, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.

याच वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून हे आमलात आणले जाऊ शकते. सध्या याची चाचणी सुरु आहे. या लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील हेराफेरी रोखता येईल, असा निवडणूक आयोगाला विश्वास आहे. याचबरोबर ईव्हीएममध्ये (EVM) कॅमेराही बसवला जाणार आहे. हा कॅमेरा मतदान करत असताना मतदाराचा फोटो टिपणार आहे. त्या माध्यमातूनही बोगस मतदान रोखले जाणार आहे. सदर व्यक्ती दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न करत असेल तर एआय तंत्रज्ञानाने त्याला ओळखून तसा अलर्ट निवडणूक अधिकाऱ्याला देण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

Sanjay Kakde

Sanjay Kakde : माजी खासदार संजय काकडे यांच्या अडचणीत वाढ! कर्ज बुडविल्याप्रकरणी कोर्टाकडून कंपनीचे शेअर्स विकण्याचे आदेश

Posted by - June 29, 2023 0
पुणे : भाजपचे माजी खासदार संजय काकडे (Sanjay Kakde) यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. विस्ट्रा आयटीसीएल लिमिटेड कंपनीचे कर्ज…
dK Shivkumar

डी.के.शिवकुमार यांच्या ‘त्या’ एका वाक्याने काँग्रेसमध्ये तणावाचे वातावरण

Posted by - May 17, 2023 0
बंगळुरू : कर्नाटकमध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये (Karnatak election) काँग्रेसला (Congress0 स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांना 22 वर्षांनंतर बहुमत…

#HEALTH WEALTH : तुम्हीही उपाशी पोटी चहा पिता का ? मग चहाचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम वाचाचं

Posted by - March 1, 2023 0
#HEALTH WEALTH : भारतात चहा पिणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. यासाठीचा चहा देशभरात लोकप्रिय आहे. लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने…

पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना मिळणार सातवा वेतन आयोग

Posted by - February 10, 2022 0
पुणे- पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पीएमपीएमएलच्या 11 हजार कर्मचाऱ्यांना अखेर सातवा वेतन आयोग मंजूर करण्यात आला आहे. आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *