प्रेषित मोहम्मद अवमान प्रकरणावरून भारतावर सायबर हल्ला ; भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

289 0

नवी दिल्ली- ठाणे पोलिसांच्या वेबसाईटसह भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक करून हॅकर्सनी त्यावर धमकी देणारा संदेश पोस्ट केला आहे. नुपूर शर्मा यांचं वक्तव्य, मंदिर-मशिद वादाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच संदेश हॅकर्सनी वेबसाईट हॅक केल्यानंतर दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावरून देशभरात राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरून भाजपाने नुपूर शर्मा यांना निलंबित केलं असलं, तरी त्यावरून विरोधकांनी जोरदार हल्लाबोल सुरूच ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या मुस्लिम हॅकर्सना भारतावर सायबर अटॅक करण्याचं आवाहन केलं.

काही वेळानंतर ही वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात ठाणे पोलिसांच्या सायबर सेलला यश आलं असलं, तरी सतर्कतेचा उपाय म्हणून काही वेळ वेबसाईटवर तांत्रिक दुरुस्ती केली जाणार असल्याचं पोलिसांकडून कळवण्यात आलं आहे. सोमवारी अशाच प्रकारे इस्त्रायलमधील भारतीय दूतावासाची वेबसाईट, राष्ट्रीय शेती व्यवस्थापन विभागाची वेबसाईट आणि कृषी संशोधन केंद्राची वेबसाईट देखील हॅक झाली होती. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तब्बल ७० भारतीय वेबसाईट्सवर हे सायबर हल्ले करण्यात आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स शासकीय विज्ञान महाविदयालयाची वेबसाईट हॅक झाली होती. याची जबाबदारीही ड्रॅगन फोर्स ऑफ मलेशिया या संघटनेन घेतल्याची माहिती त्यावेळी मिळाली होती. यात भारताविरुद्ध मोहीमेचा (anti India campaign) भाग म्हणून साईट हॅक केल्याचा मेसेजचा त्या वेबसाईटवर उल्लेख करण्यात आला आहे.

काय म्हटलंय या संदेशात ?

हॅकर्सकडून ठाणे पोलिसांच्या वेबसाईटवर पोस्ट करण्यात आलेल्या संदेशामध्ये जगभरातल्या मुस्लिमांची माफी मागण्याचा उल्लेख केला आहे. “हॅलो भारत सरकार, वारंवार तुम्ही इस्लाम धर्माबाबत समस्या निर्माण होतील असं वागत आहात. मला वाटतं तुम्हाला सहिष्णुता म्हणजे काय ते कळत नाही. लवकरात लवकर जगभरातल्या मुस्लिमांची माफी मागा. आमच्या प्रेषितांचा अवमान होत असताना आम्ही शांत बसून राहू शकत नाही”, असं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे.

Share This News

Related Post

विद्यापीठ अधिसभेचा आज निकाल : मतमोजणीचे विद्यापीठाकडून सूक्ष्म नियोजन; खाशाबा जाधव क्रीडासंकुलात सीसीटीव्हीच्या निगराणीखाली मतमोजणी

Posted by - November 22, 2022 0
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीसाठी झालेल्या मतदानाची दिनांक २२ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून यासाठी सर्व तयारी…

पुणे स्मार्ट सिटीच्या कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आढावा; शहरात डबल डेकर बसेस सुरू करण्यासाठी लवकर तयारी पूर्ण करा – चंद्रकांत पाटील

Posted by - January 9, 2023 0
पुणे : पुणे स्मार्ट सिटीअंतर्गत कामांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेतला. सर्व कामे कालमर्यादेत व गतीने पूर्ण करण्याच्या सूचना…

सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय : बलात्कार पीडितेवर केल्या जाणाऱ्या ‘Two Finger Test’ वर बंदी

Posted by - October 31, 2022 0
नवी दिल्ली : बलात्कार पीडित महिलांची तपासणी करत असताना कौमार्य चाचणी एक प्रक्रिया म्हणून मान्य केली जाणार नाही. असे महत्त्वपूर्ण…

महायुतीत वादाची ठिणगी पडणार? अजित पवारांच्या ‘या’ भूमिकेनं शिंदे गटाची अडचण होणार

Posted by - August 20, 2023 0
मुंबई: राष्ट्रवादी त उभी फूट पाडत अजित पवार थेट सत्तेत सहभागी झाले आणि भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *