Chandrayaan-3

Chandrayaan-3 : इतिहास ! इतिहास ! इतिहास ! अखेर भारत चंद्रावर पोहोचला…

1657 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने आज एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर यशस्वीपणे लँड झालं आहे. या लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे लागून राहिले होते. इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या (ISRO Moon Mission) निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडली आहे. अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग चंद्रावर जाणारा भारत चौथा देश ठरला आहे.

आतापर्यंतच्या भारताच्या चांद्रयान मोहीमा
चांद्रयान-1
28 ऑगस्ट 2008 रोजी मोहीम सुरु झाली.
12 नोव्हेंबर 2008 रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत दाखल झालं.
सुमारे 77 दिवसांचा कालावधी लागला.

चांद्रयान-2
त्यानंतर 22 जुलै 2019 चांद्रयान-2 मोहीम सुरु झाली.
6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला.
चांद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते. पण, नंतर त्याचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी ठरली.

आतापर्यंत ‘या’ देशांनी चंद्रावर जाण्याचा केला प्रयत्न
1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जपान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्त्रायलने चांद्र मोहिमा केल्या. यात इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय मशीन्स होते. यूरोपचं स्मार्ट-1, जपानचं सेलेन, चीनचं चांगई-1, भारताचं चांद्रयान-1 अमेरिकेच्या लूनर रीकॉनसेंस ऑर्बिटर मिशन यांचा यात समावेश आहे.

Share This News

Related Post

Decision Cabinet Meeting : राज्यात वीज वितरण प्रणाली मजबूत करणार ; ग्राहकांसाठी प्रिपेड-स्मार्ट मिटर बसविणार

Posted by - July 27, 2022 0
मुंबई  : राज्यातील विद्युत वितरण प्रणाली मोठ्या प्रमाणावर सुधारणा करून वितरण कंपन्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

Breaking News ! बेंगळुरूमधील विविध शाळांना एकाचवेळी धमकीचा ईमेल, पोलिसांकडून बॉम्बचा कसून शोध

Posted by - April 8, 2022 0
बेंगळुरू- बेंगळुरूमधील विविध शाळांमध्ये बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने सहा शाळा ताब्यात घेतल्या असून…
Top News Marathi Logo

वाईन बाबतचा निर्णय राज्याला कुठं घेऊन जाणार ? अण्णा हजारे यांचा सवाल

Posted by - January 31, 2022 0
केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी…
Former IPS S M Mushrif

उज्वल निकमांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा; माजी पोलीस अधिकारी एस. एम. मुश्रीफांची मागणी

Posted by - May 6, 2024 0
कोल्हापूर : मुंबईवर 26/11 दहशतवादी हल्ला होणार अशी माहिती अमेरिकेच्या गुप्तचर संघटनांनी आयबी खात्याला दिली होती. मुंबईतील दोन हॉटेलवर हल्ला…

प्रभागरचनेच्या हरकतींच्या सुनावणीसाठी एस. चोक्कलिंगम यांची नियुक्ती

Posted by - February 4, 2022 0
पुणे- पुणे महानगरपालिकेच्या जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी निवडणूक आयोगाने यशदाचे महासंचालक एस चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *