Document News

Document News : कामाची बातमी ! ‘या’ एका कागदपत्रावर होणार सर्व कामं, 1 ऑक्टोबरपासून होणार नियम लागू

702 0

येत्या एका ऑक्टोबरपासून देशान नवा नियम लागू होणार आहे. आपल्या प्रत्येकासाठी हा नियम समजून घेणं महत्त्वाचं आहे. एक ऑक्टोबरपासून जन्म दाखला सिंगल डॉक्यमेंटच्या स्वरुपात (Document News) वापरला जाणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भातलं विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पास केलं होतं. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत.हा नियम लागू झाल्यानंतर इतर कागदपत्रांची (Document News) आवश्यतकता भासणार नाही.

त्यामुळे आता शाळा-कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट असो की आधारकार्ड बनवायचं असेल तर ही सर्व कामं आता जन्मदाखल्यावर करता येणार आहेत. यामुळे अनेक कागदपत्र दाखवण्याची गरज आता भासणार नाही. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मुलांचा जन्मदाखला पालकांच्या आधारकार्डशी जोडला जाणार आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी ठेवण्यासाठी सरकार एक डेटाबेस तयार करणार आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला दोन्ही सभागृहात मंजूरी मिळाली होती.

काय आहे नवा नियम?
नव्या नियमानुसार एखाद्या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला तर रुग्णालय त्या व्यक्तीच्या कुटुंबाला मृत्यूचा दाखला देईल. रुग्णालयाबाहेर म्हणजे घरात किंवा एखाद्या ठिकाणी व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीवर उपचार करणार डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल. रजिस्ट्राररला जन्म आणि मृत्यूची मोफत नोंदणी करेल आणि सात दिवसांच्या आता मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना प्रमाणपत्र देईल. रजिस्ट्रारच्या कामाबाबत कोणाला तक्रार करायची असेल तर 30 दिवसांच्या आत अपील करता येणार आहे. ही अपील केल्यानंतर त्यावर 90 दिवसांच्या आत रजिस्ट्रारला उत्तर द्यावं लागणार आहे.

याचा काय होणार फायदा?
मृत्यू आणि जन्म नोंदी थेट मतदार यादीशी जोडल्या जातील. याचा फायदा म्हणजे एखादी व्यक्ती 18 वर्षांची झाल्यावर त्याचं नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचते. त्यानंतर त्याचे नाव यादीतून आपोआप काढून टाकलं जाईल.

Share This News

Related Post

Ghati Hospital

Ragging In Ghati Hospital : धक्कादायक ! घाटी रुग्णालयात 6 विद्यार्थ्यांचे रॅगिंग

Posted by - June 14, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रात रॅगिंगविरोधात कठोर कायदा केला असला तरी अद्यापही काही महाविद्यालयात रॅगिंगच्या (Ragging In Ghati Hospital) घटना घडत…
Satara Crime

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Posted by - January 6, 2024 0
सातारा : साताऱ्यातून (Satara Crime) एक अपघाताची घटना समोर आली आहे. आज सायंकाळी 6च्या सुमारास सातारा शहरातील पवई नाका येथे…

औरंगाबाद शहरातल्या भारत माता मंदिरात 100 हून अधिक क्रांतिकारकांचा फोटोसहित इतिहास… पाहा VIDEO

Posted by - August 10, 2022 0
औरंगाबाद : क्रांती दिनानिमित्ताने औरंगाबाद शहरातील भारत माता मंदिरात शंभरहून अधिक क्रांतिकारकांच्या फोटोंसहीत त्यांची ऐतिहासिक माहिती दर्शवण्यात आली होती.  भारत…
Jalna Crime

Jalna Crime : जालना हादरलं! जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध व्यक्तीची हत्या

Posted by - September 20, 2023 0
जालना : जालना जिल्ह्यातून (Jalna Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथे ही धक्कादायक घटना…
Rashmi Shukla

Rashmi Shukla : फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या रश्मी शुक्लांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

Posted by - October 3, 2023 0
मुंबई : फोन टॅपिंगचे आरोप झालेल्या व नंतर क्लीन चिट मिळालेल्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राच्या पोलीस…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *