Bailgada

सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय ; बैलगाडा शर्यतींना दिली परवानगी

668 0

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींबाबत (bullock cart race) महत्वपूर्ण असा निकाल दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने बैलगाडा शर्यतींचा कायदेशीर अडथळा दूर झाला आहे. आजच्या निकालाकडे बैलगाडाप्रेमींचं लक्ष लागून राहिले होते.

सलग तीन आठवडे चाललेल्या या सुनावणीमध्ये बैलगाडा शर्यतींना विरोध करणाऱ्या एकूण 15 याचिकांचा समावेश होता. तर बैलगाडा शर्यतीचे समर्थन करणाऱ्यांमध्ये तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब या राज्यांचा तसेच केंद्र शासन व ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचा समावेश होता. या अगोदर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालया(Supreme Court) ने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. मात्र त्यानंतर पुन्हा संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीकडे बैलगाडा मालकांचे तसेच शर्यत प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.

अखेर आज बारा वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात आली आहे. राज्य सरकारचा महाराष्ट्रातला बैलगाडा शर्यतीबद्दलचा कायदा वैध ठरवण्यात आला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीबद्दलचा सुप्रीम मार्ग मोकळा झाला आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने महत्वपूर्ण हा निर्णय दिला आहे.

Share This News

Related Post

Pankaja-Munde

BJP National Executive : भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी जाहीर; पंकजा मुंडेकडे दिली ‘ही’ जबाबदारी

Posted by - July 29, 2023 0
पुणे : भाजपकडून नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणीची (BJP National Executive) यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 38 जणांना स्थान देण्यात…

मोठी बातमी ! राजद्रोहाचे कलम तूर्तास स्थगित, सुप्रिम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश

Posted by - May 11, 2022 0
नवी दिल्ली- राजद्रोह कालमाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार राजद्रोहाचं कलम 124 अ तूर्तास स्थगित करण्यात आलं…
Tripura Rath Fire Video

Tripura Rath Fire Video: धक्कादायक ! जगन्नाथ रथाला लागलेल्या आगीत 2 चिमुकल्यांसह 6 जणांचा होरपळून मृत्यू

Posted by - June 29, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – त्रिपुरातील उनाकोटी जिल्ह्यात विद्युत तारांच्या संपर्कात आल्यामुळे एका रथाला (Tripura Rath Fire Video) आग लागली.…

MAHARASHTRA POLITICS : शिंदे गट आणि मनसेच्या युती संदर्भात राज ठाकरेंचा मोठा निर्णय ; सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसे…

Posted by - September 14, 2022 0
मुंबई : शिंदे गट आणि भाजपने एक साथ येऊन सत्ता स्थापन केली. त्यानंतर गणेशोत्सव काळामध्ये राज ठाकरे यांच्या भाजप आणि…

शाईफेक प्रकरणातील मनोज गरबडेसह दोघांना जामीन मंजूर; पिंपरी चिंचवडमध्ये जल्लोष

Posted by - December 14, 2022 0
पिंपरी चिंचवड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर महापुरुषांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ शाईफेक करणाऱ्या मनोज गरबडे, विजय ओव्हाळ आणि धनंजय इजगीसे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *