Bharat Ratna Award : भारतरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले ‘हे’ दिग्गज; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या हस्ते झाले वितरण

1046 0

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज देशातील 4 व्यक्तिमत्त्वांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर याना सन्मानित करण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार होते, मात्र आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून 31 मार्च रोजी राष्ट्रपती स्वतः त्यांच्या घरी जाऊन सन्मान करणार आहेत. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्यात आला आहे . त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून सन्मान स्वीकारला आहे.

‘या’ व्यक्तिमत्त्वांना मिळाले भारतरत्न पुरस्कार
माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचा चिरंजीव पीव्ही प्रभाकर राव यांनी स्वीकारला आहे. एम.एस.स्वामिनाथन यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांच्या कन्या डॉ.नित्या राव यांनी स्वीकारला आहे. कर्पूरी ठाकूर यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी स्वीकारला आहे. चौधरी चरण सिंह यांचा भारतरत्न पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्वीकारला आहे. यंदा 5 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. मदन मोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींच्या कार्यकाळात हा सन्मान मिळाला असून 2024 मधील 5 सेलिब्रेटींसह आतापर्यंत 53 लोकांना सन्मानित करण्यात आले आहे.

राष्ट्रपती मुर्मू यांनी कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या 100 व्या जयंतीच्या एक दिवस आधी 23 जानेवारी रोजी भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली होती. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. मागासवर्गीयांच्या हिताचा पुरस्कार करण्यासाठी त्यांची ओळख आहे. 9 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी डॉ. एमएस स्वामीनाथन, पीव्ही नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न (मरणोत्तर) देण्याची घोषणा करण्यात आली होती. स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ असून त्यांना भारतातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. नरसिंह राव हे भारताचे 9 वे पंतप्रधान असून चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : आधी विरोध केला आता प्रचार करणार; अजितदादांच्या विरोधकांना यंदा करावा लागणार त्यांच्याच उमेदवारांचा प्रचार

LokSabha : शरद पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर

Share This News

Related Post

Instagram Winner : मेटा कंपनीने पैठणच्या विद्यार्थ्याला जाहीर केले 30 लाखांचे बक्षीस

Posted by - March 21, 2023 0
सोशल मीडियावर अलिकडच्या काळात अनेक युजर्स हे हॅकर्सच्या जाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. मेटा कंपनीने इन्स्टाग्रामवरील बग्स शोधून काढल्याबद्दल पैठण…

अमेरिकेत 430 फूट उंच पाळण्यावरून पडून मुलाचा दुर्दैवी अंत

Posted by - March 29, 2022 0
ऑरलँडो- अमेरिकेतील ऑरलँडो येथे एका उंच स्विंगवरून पडून एका मुलाचा गुरुवारी मृत्यू झाला. थीम पार्क मधील एका थरारक खेळाच्या ठिकाणी…

प्रजासत्ताक दिन 2023 : 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जाणून घ्या परेडशी संबंधित काही रंजक गोष्टी, ज्या प्रत्येक भारतीयाला माहित असायलाच हव्यात

Posted by - January 25, 2023 0
प्रजासत्ताक दिन उद्या देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. यावर्षी देश आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे.…
Gujrat Viral Video

Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण

Posted by - August 4, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये (Gujrat Viral Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास…
Ajit Pawar

Aditya-L1 Mission : आदित्य एल1च्या यशस्वी उड्डाणानंतर अजित पवारांनी शास्त्रज्ञांचे केले अभिनंदन

Posted by - September 2, 2023 0
भारताच्या सूर्य मोहिमेचं प्रक्षेपण करण्यात आले आहे. सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने भारताचे आदित्य (Aditya L1) यान सूर्याच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *