Basavaraj Bommai

भाजपच्या महत्वाच्या बैठकीमध्ये अचानक झाली ‘त्याची’ एन्ट्री; आणि मग….. (Video)

230 0

बंगळुरू : कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान पार पडले होते. यानंतर आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये सध्या कर्नाटकच्या जनतेची काँग्रेसला पसंती मिळताना दिसत आहे. सध्याच्या कलानुसार काँग्रेसचे 114 उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपचे 73 उमेदवार पुढे असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपची एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीदरम्यान अचानक सापाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले .

काय घडले नेमके?
भाजपचे (BJP) उमेदवार शिवराज सज्जन (Shivraj Sajjan) यांच्या घरात भाजपची बैठक सुरू होती. या बैठकीला भाजपचे इतरही नेते उपस्थित होते. ही बैठक सुरु असताना अचानक शिवराज सज्जन यांच्या घरात साप घुसला आणि बैठकीदरम्यान एक गोंधळ उडाला. यानंतर याची माहिती सुरक्षा रक्षकांना देण्यात आली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने सापाला बाहेर काढून सगळी परिस्थिती कंट्रोलमध्ये केली आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीबाबत (Karnatak Election) काँग्रेस (Congress) अलर्ट मोडवर आहे. कर्नाटक राज्याच्या राजकारणात पुन्हा रिसॉर्ट पॉलिसीचा अवलंब होणार आहे. काँग्रेसकडून सर्व आमदारांना एकाच रिसॉर्टमध्ये ठेवलं जाणार आहे. 2019 च्या निवडणुकीप्रमाणे पुन्हा रिसॉर्ट पॉलिसीची जबाबदारी डिके शिवकुमार (DK Shivkumar) यांच्याकडे देण्यात आली आहे.

Share This News

Related Post

Prakash Ambedkar and Eknath Shinde

Prakash Ambedkar : ‘एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबत यावं’, प्रकाश आंबेडकरांनी दिली ऑफर पण ठेवली ‘ही’ अट

Posted by - January 30, 2024 0
वाशिम : लोकसभेच्या निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. पक्ष…
Dhule News

Dhule News : काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याच्या सूतगिरणीवर आयकर विभागाकडून छापा

Posted by - October 1, 2023 0
धुळे : धुळ्यामधून (Dhule News) एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या सहकारी सूतगिरणीवर आयकर…

महत्त्वाच्या मुद्द्यांपासून सामान्य जनतेचं लक्ष वळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न – वरुण सरदेसाई

Posted by - March 27, 2022 0
महत्त्वाच्या मुद्द्यांपासून सामान्य जनतेचं लक्ष वळवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू असून 5 राज्यातील निवडणुका संपताच लगेच देशातील इंधनाचे दर वाढण्यास…

कलकत्ता उच्च न्यायालयाचा मोठा निर्वाळा; ‘वंध्यत्व’ घटस्फोटाचा आधार होऊ शकत नाही !

Posted by - January 21, 2023 0
कलकत्ता : आजच्या युगात देखील वंध्यत्वामुळे अनेक गुन्हेगारी वृत्त उजेडात येत आहेत. काळी जादू ,आघोरी पूजा ,हत्या अशा गुन्ह्यांसह मूल…
Samruddhi Mahamarg

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ‘या’ पक्षाचे दोन कार्यकर्ते जखमी

Posted by - March 4, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघाताची (Samruddhi Mahamarg) घटना समोर आली आहे. या अपघातात 2 जण जखमी झाले…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *