imran-khan

Imran Khan Bail: अखेर इम्रान खान यांना जामीन मंजूर

288 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान (Imran Khan) यांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यांना आता इस्लामाबाद उच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात हायकोर्टाने त्यांना 2 आठवड्यांसाठी हा जामीन (Bail) मंजूर करण्यात आला आहे. तसेच खान यांना 17 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अटक करू नये, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.

इम्रान खान यांना मंगळवारी इस्लामाबाद उच्च न्यायालयातून (ISLAMABAD HIGH COURT) पाक रेंजर्सच्या पथकाकडून अटक करण्यात आली होती. इम्रान खान यांना अटक झाल्यानंतर पाकिस्तानमध्ये ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आले होते. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी जाळपोळदेखील करण्यात आली होती. यानंतर आता पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने इम्रान यांची अटक बेकायदेशीर ठरवत त्याची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत.

Share This News

Related Post

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका; त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळला

Posted by - March 3, 2022 0
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला…

नाराजी बाजूला सारून जगदीश मुळीक यांनी घेतली मुरलीधर मोहोळांची गळाभेट

Posted by - March 16, 2024 0
खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची जागा रिक्त होती. या जागेवर नवा खासदार कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष…
Rishikesh Bedre

Rishikesh Bedre : मराठा आंदोलक ऋषिकेश बेदरेला जामीन मंजूर; मात्र ‘या’ जिल्ह्यात जाण्यास घातली 3 महिन्यांची बंदी

Posted by - December 14, 2023 0
जालना : आंतरवाली सराटी येथील उपोषणास्थळी झालेल्या दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरेला (Rishikesh Bedre) मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगबाद खंडपीठाकडून…

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा विसर पडल्याचे दिसले – चंद्रकांत पाटील

Posted by - May 14, 2022 0
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी मुंबईतील सभेत भाषण करताना राज्याच्या विकासाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचे विसरले. स्वतः पेट्रोल डिझेलची महागाई…

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ; दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर

Posted by - April 16, 2022 0
गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *