Aditya-L1 Solar Mission

Aditya-L1 Solar Mission: चंद्रानंतर आता सूर्याची बारी; कुठे पहाल Aditya-L1 चं थेट प्रक्षेपण?

788 0

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थातच इस्रोच्या (ISRO) आज पहिल्या सूर्य मोहिमेचा शुभारंभ (Aditya-L1 Solar Mission) होणार आहे. आदित्य एल1 (Aditya L1) हे यान शनिवार (2 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा (Sriharikota) सतीश धवन अवकाश केंद्रातून या ग्रहाचे प्रक्षेपण (Aditya-L1 Solar Mission) करण्यात येणार आहे. पीएसएलव्ही (PSLV) रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

कुठे पहाणार मिशन आदित्यचं थेट प्रक्षेपण?
आदित्य एल1 च्या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण हे इस्रोच्या अधिकृत बेवसाईटवर करण्यात येणार आहे. तसेच तुम्ही यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून देखील थेट प्रक्षेपण पाहू शकता. डीडी वाहिनीवर देखील या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. सकाळी 11.20 मिनिटांनी या लाँचिंगचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

 

पाच टप्प्यात पूर्ण होणार सूर्याचा प्रवास
आदित्य एल1 हे पाच टप्प्यात सूर्यापर्यंतचा प्रवास पूर्ण करणार आहे. या प्रवासासाठी जवळपास 125 दिवसांचा कालावधी लागेल. पहिल्या टप्प्यात पीएसएलव्ही रॉकेटच्या साहाय्याने आदित्य एल 1 चे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात हे यान पृथ्वीच्या कक्षेत विस्तारले जाईल. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण प्रभावाच्या बाहेर हे यान तिसऱ्या टप्प्यात काढले जाईल. चौथ्या टप्प्यात हे यान सूर्याच्या दिशेने प्रवास सुरु करेल. तर पाचव्या टप्प्यात एल1 पाईंटवर पोहोचणार आहे.

Share This News

Related Post

इंदूर दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू, १० जणांना वाचवण्यात यश

Posted by - March 30, 2023 0
आज रामनवमीचा सण सर्वत्र उत्साहात सुरु असतानाच इंदूरच्या श्री बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरात विहिरीवरील छत तुटल्यामुळे दर्शनासाठी आलेले २५ भाविक…

दुसऱ्यांदा सत्तेत येताच धामी सरकारचा मोठा निर्णय ; उत्तराखंड मध्ये लवकरच समान नागरी कायदा

Posted by - March 25, 2022 0
डेहराडून- उत्तराखंडमध्ये पुन्हा सत्तेत आलेल्या भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्यात लवकरच समान नागरी कायदा लागू करणार असल्याची घोषणा…

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप ; राहुल गांधी म्हणतात , “प्रवासातून मी खूप काही शिकलो…!”

Posted by - January 30, 2023 0
श्रीनगर : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा आज जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमध्ये समारोप होणार आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील या यात्रेसाठी आज अनेक…

‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ राज ठाकरेंनी अशी कुणावर केली टीका

Posted by - May 22, 2022 0
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातील सभेत भोंग्यांसंदर्भातील विषय छेडला. जर मशिदींवर भोंगे लावले तर मशिदिंसमोर लाऊडस्पिकरवर हनुमान…

APPLE प्रेमींसाठी खास बातमी ! मुंबईमध्ये उघडणार APPLE चे भारतातील पहिले फ्लॅगशिप स्टोअर; कुठे, केव्हा ? वाचा ही बातमी

Posted by - March 21, 2023 0
भारतामध्ये देखील APPLE प्रेमी खूप आहेत. आयुष्यात एकदा तरी APPLE चा फोन, लॅपटॉप अशी उपकरणे वापरावीत असा अगदी प्रत्येकालाच वाटत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *