Rajarshi Shahu Maharaj Jayanti

Rajarshi Shahu Maharaj Jayanti : राजर्षी शाहू महाराजांच्या जंयतीनिमित्त मुस्लिम युवकाकडून “मोफत” रिक्षा सेवा; श्रीमंत शाहू छत्रपतींनी केलं कौतुक

321 0

कोल्हापूर : आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) आहे. शाहू महाराजांनी समाजाला कायम समतेचा संदेश दिला.त्यांनी सर्व धर्मियांच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे चालू केली, त्याच वसतिगृहातून पुढे अनेक विद्यार्थी घडले.आज शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) कोल्हापुर मधील एका मुस्लिम युवकाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

ह्या युवकाचा रिक्षा चालवण्याचा व्यवसाय आहे. त्याने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज प्रवाशांसाठी दिवसभर मोफत रिक्षा उपलब्ध करून दिली आहे. त्याने राबवलेल्या या उपक्रमासाठी त्याचे कोल्हापूरमधील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या मुस्लिम युवक रिक्षाचालकाची श्रीमंत शाहू छत्रपती यांनी भेट घेतली आहे.

Ratnagiri Accident : दापोलीत भीषण अपघात ! 8 जण ठार तर 7 जण जखमी

श्रीमंत शाहू छत्रपतींनी केलं मुस्लिम युवक रिक्षाचालकाचं कौतुक
श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मुस्लिम युवक रिक्षाचालकाची भेट घेऊन त्याच्याशी संवाद साधला. त्यांनी या उपक्रमाबद्दल तरुणाचं कौतुक देखील केलं आहे. एवढंच नाही तर श्रीमंत शाहू छत्रपती त्या रिक्षा चालकाच्या सीटवर देखील बसले. छत्रपती शाहू महाराज यांनी (Rajarshi Shahu Maharaj Jayanti) समाजाला समतेचा संदेश दिला होता, आणि ह्याच समतेच्या संदेशातून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न आजही होताना दिसत असल्याचं श्रीमंत शाहू छत्रपती यांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

Ullas Bapat

… उद्धव ठाकरेचं पुन्हा मुख्यमंत्री होतील; घटनातज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान

Posted by - May 10, 2023 0
पुणे : राज्यातील सत्तासंघर्षाचा उद्या (दि.11 मे) रोजी निकाल जाहीर होणार असून या निकलापूर्वीच घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मोठं विधान…

उत्तर प्रदेशात भाजप सुसाट!उत्तर प्रदेशच्या विजयावर भाजपाचा पुण्यात जल्लोष 

Posted by - March 10, 2022 0
उत्तर प्रदेशसह देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. 5 राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांपैकी 4 ठिकाणी…

लक्ष्मण हाके यांच्या खांद्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी

Posted by - November 13, 2022 0
सोलापूर: धनगर समाजाचे नेते आणि राज्य मागासवर्गीय समितीचे सदस्य लक्ष्मण हाके यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य लक्ष्मण हाके…

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेना प्रवक्त्यांची बैठक

Posted by - August 3, 2022 0
मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातल्या राजकारणात दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आज राज्यात नव्यानं स्थापन केलेल्या सरकारसाठी म्हणजेच शिंदे…
Pune Viral Video

Pune Viral Video : वारकरी पोशाख ,पाठीवर बॅग पुण्यातील ‘त्या’ तरुणांचा वेगळाच स्वॅग; Video व्हायरल

Posted by - December 18, 2023 0
पुणे : पुणे हे देशातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील संस्कृती (Pune Viral Video) असो की येथील…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *