Galande Patil

गौतमीला बीडच्या पाटलाने घातली लग्नाची मागणी; पत्र व्हायरल

770 0

बीड : मागच्या काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असताना आता बीडच्या एका तरुणाने थेट पत्राद्वारे लग्नाची मागणी घातली आहे. “गौतमी पाटील तु भारी तुझ्या घरी, पण तु होती का माझी परी” असे म्हणत या तरुणाने तिला थेट पत्र लिहीत मागणी घातली आहे. रोहन दादा गलांडे (पाटील) असे हे पत्र लिहिणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

नेमके काय लिहिले आहे पत्रामध्ये?
प्रिय,
“गौतमी पाटील तु भारी, तुझ्या घरी पन तु होती का माझी परी, मी रोहन दादा गलांडे (पाटील) तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पत्र लिहिण्याचे कारण एका मुलाखतीमध्ये तुला कसा जोडीदार हवाय हे सांगताना म्हणाली होती की, “आता मी 25 वर्षाची आहे. लग्न करुन घरसंसार थाटावा अशी माझी इच्छा आहे. फक्त मला माझ्या इच्छेप्रमाणे जोडीदार हवा आहे. मला मान, सन्मान, प्रसिद्धी, पैसा नकोय. फक्त त्याने मला कोणत्याही परिस्थितीत साथ द्यायला हवी. मी लहानपणी मुलींच्या शाळेत शिकली. मला भाऊ नाही, त्यामुळे पुरुष मंडळींशी माझा संबंध कधीच आला नाही. माझ्या संसाराचा भार आता एका पुरुषाने उचलावा अशी माझी मनापासून इच्या आहे. म्हणूनच मी आता लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेणार आहे.” तरी तुझ्या वरील सर्व इच्छा अटी मला मान्य आहेत. तरी मी रोहन दादा गलांडे (पाटील) मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. तरी तु जशी आहेस तशीच मला आवडली आहे. जरी तुझ्या सोबत कुनी लग्नाला तयार नसले तरी मी माणुसकीच्या नात्याने तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. माझे वय 26 वर्ष आहे व मी एक शेतकरी पुत्र आहे. शेती बागायती आहे, दुग्ध व्यावसाय आहे. तु जर माझ् यासोबत लग्नाला तयार असशील तर तु मला भेटायला ऐ पत्ता मु. पो. चिंचोली (माळी), ता. केज, जि. बीड, पीन कोड 431123 मोबाईल नंबर **********. या पत्यावर तु मला भेटायला ये मी तुझ्या सोबत लग्न करायला मी तयार आहे.

हे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे आता गौतमी पाटील या तरुणाच्या मागणीवर काय प्रतिक्रिया देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. गौतमीने लग्नाची भावना व्यक्त केल्यानंतर तिला थेट लग्नाची मागणी घालणारा तरुण समोर आल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Share This News

Related Post

किमतीचे लेबल लावून तरुणींचे फोटो शेअर करणाऱ्या विकृत तरुणाला अटक

Posted by - February 12, 2022 0
मुंबई- सोशल मीडियावर किमतीचे लेबल लावून कॉल गर्ल्स असा उल्लेख करत तरुणींचे फोटो शेअर करणाऱ्या विकृत तरुणाला अँटॉप हिल पोलिसांनी…

…. त्या आजींच सत्कारचं केला पाहिजे; मनसे नेते संदीप देशपांडे यांचं खोचक ट्विट

Posted by - April 25, 2022 0
राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापले असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मातोश्री समोरच हनुमान चालीसाचे…
Jalgaon News

Jalgaon News : कुटुंबाचा आधार हरपला ! मोठ्या उत्साहाने कामावर आला, पण कामाचा पहिलाच दिवस ठरला अखेरचा

Posted by - October 17, 2023 0
जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कदायक घटना घडली आहे. यामध्ये कामाच्या पहिल्याच दिवशी जळगाव एमआयडीसीत प्लास्टिक कंपनीत विजेचा धक्का…
Gondia News

Gondia News : बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबले अन् गमावला जीव

Posted by - October 31, 2023 0
गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्गावर आज…
Nagpur News

Nagpur News : नागपुरात ढगफुटी सदृश पाऊस; नागनदीला आला पूर

Posted by - September 23, 2023 0
नागपूर : काल मध्यरात्रीपासून नागपुरात (Nagpur News) मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्यानं नागनदीला पूर आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *