पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबई झोनमध्ये योग दिवस साजरा

383 0

मुंबई- जागतिक योगदिनानिमित्त पंजाब नॅशनल बँक, प्रगती टावर्स, कुर्ला बांद्रा कॉम्पलेक्स येथे सकाळी झोनल मॅनेजर बी.पी.महापात्र यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई शहरातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितिमध्ये योग दिवस साजरा करण्यात आला.

यावेळी बी.पी.महापात्र यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग प्रात्यक्षिक व योगाचे महत्व जाणून घेतले. जीवनामध्ये योगसाधनेचे महत्व, योगामार्फत चिंतामुक्त जीवन कसे जगावे तसेच योगसाधनेद्वारे निरोगी जीवन कसे जगावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सर्व अधिकाऱ्यांना योगाचे महत्व समजावून देताना महापात्र म्हणाले की योगविद्येची सुरुवात भारतातच झाली व सर्व जगाला भारतानेच योगाचे महत्व पटवून दिले. आज जगात सर्वत्र जागतिक योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो कारण योगाचे महत्व जगाला पटलेले आहे. याविषयी जनजागृति करणे आवश्यक आहे.

भारतात सुमारे 3000 वर्षापुर्वी महर्षी पतंजली यांनी योगसूत्रांची रचना केली. योगशास्त्र या ग्रंथाची रचना केली. हठयोगाची परंपरा देखील आमच्या भारत देशातच आहे. योगसाधनाचे गुरु शिव असून प्रचारक महर्षी पतंजली आहेत असे ते म्हणाले. योग दिवसाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना योगसाधना करण्यासाठी प्रेरित केले व निरोगी जीवन जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Share This News

Related Post

Ram Satpute

Solapur Loksabha : भाजपचं टेन्शन वाढणार? सोलापूरच्या राजकारणात आला ‘हा’ मोठा ट्विस्ट

Posted by - April 22, 2024 0
सोलापूर : आज सोलापूरच्या (Solapur Loksabha) राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या शेवटच्या दिवशी सोलापुर मतदारसंघात…

राज्यात सर्वत्र मंगल होण्यासाठी साडेतीन पीठाचे दर्शन ; नाशिकमधील पर्यावरण विषयाचा पाठपुरावा करणार : ना. डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - September 28, 2022 0
नाशिक : महाराष्ट्रात मुलींचे अपहरण, शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अनेक चांगल्या योजनांना स्थगिती दिलेली आहे. राष्ट्रीय अहवालानुसार अपहरणाच्या क्षेत्रात…
Madhuri Dixit

Madhuri Dixit : धक धक गर्ल माधुरीची अधुरी प्रेम कहाणी… ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटरसोबत जोडले होते नाव

Posted by - July 30, 2023 0
मुंबई : धक धक गर्ल माधुरी दीक्षितला (Madhuri Dixit) आपण सगळेच ओळखत असाल. 90 च्या दशकामध्ये आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना…
Malegaon News

Malegaon News : विहिरीतून पाणी काढताना तोल जाऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - April 5, 2024 0
मालेगाव : नाशिकमधून (Malegaon News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *