Top News Marathi Logo

वाईन बाबतचा निर्णय राज्याला कुठं घेऊन जाणार ? अण्णा हजारे यांचा सवाल

283 0

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्रात राज्य सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

निर्णयावरून राज्य सरकारवर विरोधकांनी टीका केली आहे. महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्यात येत असल्याचं भाजपने म्हटलं आहे.

आता यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारचा निर्णय महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे.

त्यांनी म्हटलं की, हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असेच म्हणावे लागेल. एकीकडे राज्य सरकार हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतल्याचे सांगत आहे.

तसेच वाईन म्हणजे दारू नाही असेही सांगण्यात येत आहे. असे निर्णय ह्या राज्याला कुठे घेऊन जाणार हा खरा प्रश्न आहे.
सरकारने घेतलेल्या वाईन विक्रीच्या निर्णयाचा राज्यातील जनता निषेध करीत आहे तर सरकारमधील लोक मात्र या निर्णयाचे समर्थन करीत आहेत.

केवळ महसूल मिळतो म्हणून अशा प्रकारे मद्य विक्रीला रान मोकळे करून देण्यासाठी सरकारने प्राधान्य देणे हे या राज्यातील जनतेसाठी दुर्दैवी आहे असल्याचं म्हणत अण्णा हजारे यांनी सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला.

Share This News

Related Post

#SOLAPUR ACCIDENT : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या ट्रॅव्हल्सला अपघात; एकाचा मृत्यू, आठ जण गंभीर जखमी

Posted by - January 18, 2023 0
सोलापूर : येथील मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा फाटा या ठिकाणी देवदर्शनासाठी निघालेल्या 38 भाविकांच्या ट्रॅव्हल्सला मोठा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…
Washim News

Washim News : समृद्धी महामार्गावर कार उलटून भीषण अपघात; 4 जण जखमी

Posted by - September 20, 2023 0
वाशिम : समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वाशिम जिल्ह्यातील (Washim News) शेलुबाजार जवळ जंगली…
Warkari

Insurance Coverage : शासनातर्फे वारकऱ्यांना मिळणार विमा संरक्षण; लाखो वारकऱ्यांना मिळणार दिलासा

Posted by - June 21, 2023 0
मुंबई : पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी शासनातर्फे विमा संरक्षण (Insurance Coverage) देणारी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना…
Eknath Khadse

Eknath Khadse: एकनाथ खडसेंना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात जामीन मंजुर

Posted by - October 12, 2023 0
मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे (Eknath…
Jayant Patil

Jayant Patil : ‘आता जनताच ठरवेल कोण असली कोण नकली?’ जयंत पाटलांचं अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Posted by - April 12, 2024 0
नागपूर : लोकसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. प्रचाराची रणधुमाळीसुद्धा सुरु झाली आहे. सर्व नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोप यांच्या फैरी सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *