Maharashtra Rain

Weather Update : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात हवामान खात्याकडून हाय अलर्ट जारी

3595 0

मुंबई : राज्यातील कोकण, मुंबई आणि पालघर भाग वगळता उर्वरित भागांमध्ये पावसाळी वातावरण (Weather Update) होत आहे. सध्या गुजरातपासून कोकणासह कर्नाटकापर्यंत वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण होत असल्याने या भागांमध्ये तापमानात चढ- उतार नोंदवण्यात येत असून काही भागांवर ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही पावसाची हजेरी मात्र राज्याच्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रमध्ये थैमान घालताना दिसणार आहे.

हवामान विभागाच्या मुंबई शाखेने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासोबत वादळ आणि वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यादरम्यान इथं ताशी 30-40 किमी वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

‘या’ भागांमध्ये पावसाचा अंदाज
बीड, लातूर, उस्मानाबाद, सांगलीतील दुर्गम भाग, परभणी आणि सोलापूर या भागांसोबत मध्य महाराष्ट्रात देखील ढगांच्या गडगडाटाची शक्यता हवामान विभागा कडून वर्तवण्यात येत आहे. राज्याच्या काही भागात ढगांची चादर असली तरीही उष्णतेचा दाह काही केल्या कमी होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

‘या’ भागांना हवामान विभागाने दिला अलर्ट
राज्यात सुरु असणाऱ्या अवकाळी पावसाळामुळे चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोलीमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नांदेड, हिंगोलीमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूरमध्येही वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Prakash Ambedkar : महाविकास आघाडीने भाजपसोबत 20 जागा फिक्स केल्या; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप

Jayant Patil : ‘आता जनताच ठरवेल कोण असली कोण नकली?’ जयंत पाटलांचं अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर

Loksabha : शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याला वंचित कडून धाराशिव लोकसभेची उमेदवारी जाहीर

Pune News : शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Punit Balan : राज्य अजिंक्य स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडूंना ‘पुनीत बालन ग्रुप’कडून इलेक्ट्रिक बाईक भेट

Loksabha : वंचितकडून लोकसभेसाठीची 5 वी यादी जाहीर

Share This News

Related Post

पुण्यासाठी पुढचे 48 तास महत्वाचे; हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा

Posted by - July 13, 2022 0
पुणे: पुण्यात गेल्या आठवड्या पासून जोरदार पाऊस सुरू आहे. सर्वाधिक पाऊस लोणावळा परिसरात सुरू आहे. या सोबतच खेड, आंबेगाव, जुन्नर,…
Navneet Kaur Rana

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Posted by - March 28, 2024 0
अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अमरावतीतून (Amravati News) उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा…

ज्येष्ठ महिलेला सारसबागेसमोर भीक मागण्याची वेळ आणणाऱ्या अवैध सावकाराला बेड्या (व्हिडिओ)

Posted by - February 9, 2022 0
पुणे- सारसबागेसमोर भीक मागून आपली गुजराण करत असलेल्या 70 वर्षाच्या ज्येष्ठ महिलेची करुण कहाणी एका भाविकांने आपुलकीने केलेल्या चौकशीमुळे उघड…

#PUNE : वाघापूर ते शिंदवणे या मार्गावरील वाहतूक बंद करण्याबाबत आदेश; नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

Posted by - March 21, 2023 0
पुणे : पीएन-२९ अंतर्गत तळेगाव ढमढेरे ते जेजुरी राष्ट्रीय मार्ग क्रमांक ११७ या रस्त्याचे मजबुतीकरण तसेच शिंदवणे घाटमाथा येथील पुलाचे…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज उद्घाटन होणारं नवीन संसद भवन आहे तरी कसं ?

Posted by - May 28, 2023 0
नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या सेंट्रल विस्टा अर्थात नवीन संसदेचा आज लोकार्पण होत असून दुपारी एक वाजता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *