Maharashtra Rain

Maharashtra Weather News : मान्सून अंदमानात दाखल ! ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

1832 0

मुंबई : दुष्काळ तसेच पाणीटंचाईच्या झळा सोसणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा लवकरच पाऊस (Maharashtra Weather News) पडण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून रविवारी अंदमानात दाखल झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षी लवकर पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे हवामान खात्याने आज सोमवार आणि उद्या मंगळवारी देशातील अनेक राज्यांमध्ये तुफान पावसाचा इशारा दिला आहे.

सध्या अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. त्याचबरोबर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, हरियाणा, दिल्ली, पंजाब, राजस्थान उत्तर प्रदेश, या राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर या ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचा विचार केला तर नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय जळगाव, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, बीड, लातूर, हिंगोली जिल्ह्यांना देखील पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News

Related Post

#BEAUTY TIPS : पॅची दाढीमुळे खराब झाले सौंदर्य ? स्टाईलिश लूकसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स

Posted by - March 15, 2023 0
आजकाल लांब दाढी प्रचलित आहे. रन मशीन विराट कोहलीपासून ते किवी वॉल केन विल्यमसनपर्यंत अनेक बड्या स्टार्स आणि अॅथलीट्सच्या दाढी…

नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर पोलीस महासंचालकांना दिल्लीत हजर होण्याचे आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई – खासदार नवनीत राणा यांना अटक करण्याची कारवाई मुंबई पोलिसांच्या अंगाशी येणार आहे अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नवनीत…
Ashok Chavan

Ashok Chavan : संजय राऊतांनी अशोक चव्हाणांच्या बाबतीत केला ‘हा’ मोठा गौप्यस्फोट

Posted by - February 13, 2024 0
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा हात सोडत पक्षाच्या सदस्यपदाचा…
Barty

BARTY Researcher : अनु.सूचित जाती समाजातील बार्टी संशोधक संतप्त

Posted by - August 14, 2023 0
पुणे : आम्ही 2018 ते 2022 पर्यंतचे संशोधक विद्यार्थी सांगू इच्छितो की, अनु.जाती तील विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करण्यासाठी बार्टी संस्थेने…

पुणे शहर प्लॉगेथॉनची एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रमी नोंद

Posted by - June 6, 2022 0
    पुणे शहरात ‘पुणे प्लॉगेथॉन 2022′ चे आयोजन करण्यात आले होते. रविवारी झालेल्या पुणे प्लॉगेथॉन मेगा ड्राईव्ह अंतर्गत एकूण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *