Hasan Mushrif

Maratha Reservation : गाडीची तोडफोड प्रकरणी हसन मुश्रीफांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

768 0

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. शांततेत चाललेल्या या आंदोलनाने अचानक हिंसक वळण घेतले आहे. राज्यात काही ठिकाणी बस, पक्षांची कार्यालये, आमदारांची घरे जाळण्यात येत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच आता या आंदोलकांकडून मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी येथील आमदार निवासाबाहेर ही गाडी पार्क करण्यात आली होती. दोन व्यक्तींकडून वाहनाची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे. या हल्ल्याप्रकरणी हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले हसन मुश्रीफ ?
‘मी सुरक्षित आहे. घटन घडली त्यावेळी मी तिथं नव्हतो. सध्या ठराविक दोन ते तीन व्यक्ती ठरवून आमदार आणि खासदारांना फोन करत आहेत. त्यानंतर त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहेत. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर चर्चा झाली. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आम्ही सर्व आमदारांनी एक दिवशीय अधिवेशनाची मागणी केली आहे. ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्या भावना समजून शकतो. मी स्वतः गृह खात्याला फोन करुन त्यांच्यावर कारवाई करू नका असं सांगणार असल्याची’ प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

Share This News

Related Post

Jalna News

Jalna News : जालन्यात मराठा समाज आक्रमक, तरुणाने स्वत:ची बाईक पेटवली

Posted by - September 3, 2023 0
जालना : जालन्यात (Jalna News) मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमुळे निषेध म्हणून आज महाराष्ट्रात (Jalna News) बंदचे आवाहन करण्यात आले…

धक्कादायक : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या मित्राचा खून; चाकूनं भोसकून दहाव्या मजल्यावरून खाली ढकललं, पतीला अटक VIDEO

Posted by - October 28, 2022 0
भोसरी : पत्नीच्या मित्राला धारदार शस्त्रानं भोसकून दहाव्या मजल्यावरील राहत्या घराच्या गॅलरीतून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या…

एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल जाहीर; विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Posted by - March 8, 2022 0
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 च्या पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर झाला आहे. तब्बल 3 वर्षानंतर हा निकाल…

मोठी बातमी : कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद प्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा करणार मध्यस्थी; 14 डिसेंबरला होणार महत्त्वाची चर्चा

Posted by - December 9, 2022 0
नवी दिल्ली : सध्या महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न मोठ्या प्रमाणावर चिघळल्याने महाराष्ट्रातील खासदारांनी आज सकाळी अमित शहा यांची भेट घेतली.…

संगमनेरमध्ये महिला ओढतात हनुमानाचा रथ, काय आहे त्या मागील कारण ?

Posted by - April 6, 2023 0
हनुमान आणि महिला हे विसंगत असणारं समीकरण आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात ब्रह्मचारी असणाऱ्या मारुती देवाचा रथ ओढण्याचा मान महिलांना…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *