महापारेषणकडून टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम ; सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

307 0

महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर या १३२ केव्ही अतिउच्च दाब टॉवर लाईनचे तातडीचे दुरुस्ती काम करणे अत्यावश्यक असल्याने नगररोड, विमाननगर, कल्याणीनगर, येरवडा या परिसरामध्ये सोमवारी (ता. ११) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास महापारेषणकडून दोन तासात हे दुरुस्ती काम पूर्ण करण्यात येणार आहे.

याबाबत माहिती अशी की, महापारेषण कंपनीच्या खराडी ते थेऊर अतिउच्च दाब उपकेंद्रादरम्यान टॉवर लाईनचे जम्प बदलण्याचे काम प्रस्तावित आहे. हे काम तातडीचे व अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून सोमवारी (ता. ११) पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या तांत्रिक कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून होणाऱ्या महावितरणच्या २२ केव्ही १९ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरुपात सुरु ठेवण्यात येणार आहे. तथापि विजेचे भार व्यवस्थापन शक्य होत नसल्याने उर्वरित ८ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पहाटे दोन तास नाईलाजाने बंद ठेवावा लागणार आहे.

त्यामुळे सोमवारी (ता. ११) पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान या ८ वीजवाहिन्यांवरील गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पीटल परिसर, विमानगर, रोहन मिथीला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाऊसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन महापारेषण व महावितरणकडून करण्यात आले आहे. या परिसरातील वीजग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर या संदर्भात ‘एसएमएस’द्वारे माहिती देण्यात येत आहे.

Share This News

Related Post

drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 16, 2023 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या…

पुणे महापालिकेची धडक कारवाई, थकबाकी असलेली 59 दुकाने केली सील

Posted by - May 7, 2022 0
पुणे – पुणे महापालिकेत प्रशासक आल्यापासून कारवाईचा धडाका सुरू आहे. आता महानगरपालिकेने सुमारे आठवडाभरात थकबाकी वसुलीसाठी व्यावसायिक हेतूने भाडेतत्त्वावर दिलेली…
Darshana Pawar Murder Case

Darshana Pawar Murder Case : दर्शना पवार मर्डर केसचं गूढ वाढलं.., तिचा मित्रही गायब?

Posted by - June 19, 2023 0
पुणे : काही दिवसांपूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ)…
Chhatrapati Sambhaji Nagar

Chhatrapati Sambhaji Nagar : आईची भेट राहिली अधुरी ! आजारी आईला भेटण्याआधीच तरुणाने घेतला जगाचा निरोप

Posted by - September 9, 2023 0
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आई आजारी असल्यामुळे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *