नाशिक : आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने आज नाशिकमध्ये (Uddhav Thackeray Nashik Visit) राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिक येथे दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंचे जंगी स्वागत केले आहे. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत.
काळाराम मंदिराचे घेणार दर्शन
उद्धव ठाकरे भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला अभिवादन करून सायंकाळी पाच वाजता काळाराम मंदिरामध्ये जाऊन प्रभू रामाचे दर्शन घेणार आहेत. तसेच यावेळी महाआरती देखील करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता उद्धव ठाकरे गोदा आरती करणार आहेत.
उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा
दि. 23 जानेवारीला नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ठाकरे यांची जाहीर सभा हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होईल. या सभेतून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Atal Setu : अटल सेतूवर पहिला अपघात ! 3 जण जखमी; Video आला समोर
Chandrapur News : चंद्रपूरने केला विश्वविक्रम ! 33 हजार 258 पणत्यांनी साकारला रामनामाचा मंत्र
Maharashtra Weather : राज्यावर अवकाळी पावसाचं संकट! ‘या’ ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता
Ram Mandir : राम मंदिरासाठी सर्वाधिक देणगी कोणी दिली?
Ram Mandir : लालकृष्ण अडवाणी आज अयोध्येला जाणार नाहीत; समोर आले ‘हे’ कारण
Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान
Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका
Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण
Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे
Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल