पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

299 0

पुणे – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ प्रकल्पयुक्त पाणपोई व जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजिटल दर्शन सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आमदार सुनील शेळके, उद्योगपती दिना धारिवाल, प्रकाश धारिवाल, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त संदीप राक्षे, स्मिता चव्हाण व देहूचे ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यमंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, “एलईडी पटलाच्या माध्यमातून भाविकांना जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे दर्शन घेता येईल. कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात आषाढी पालखी सोहळा झाला नव्हता. यंदा मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे सर्वच भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. पाणपोईच्या माध्यमातून भाविकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात मिळू शकेल” अशी सेवा देणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांचे शिल्प इंद्रायणी नदीत उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्यात यावा. भाविकांची वाढती संख्या पाहून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.

 

 

Share This News

Related Post

#JOB : SBI BCF भरती 2023: 868 पदांसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू

Posted by - March 10, 2023 0
#JOB : एसबीआय नोकरीच्या इच्छुकांसाठी नोकरीची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय)…

HEAVY RAIN : पुन्हा जोरदार पाऊस, पुन्हा रस्त्यांचे झाले ओढे, पुणे तिथे काय उणे… PHOTO

Posted by - October 14, 2022 0
पुणे : पुण्याला आज दुपारी पावसाने पुन्हा एकदा जोरदार झोडपून काढले आहे. कुलाबा हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १८ ऑक्टोबर पर्यंत…
Parbhani News

Pune Crime News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा तरुणीवर कोयत्याने हल्ला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला

Posted by - April 1, 2024 0
पुणे : सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेम प्रकरणातून कॉलेज तरुणीवर हल्ला (Pune Crime News) झाल्याची पुनरावृत्ती आज पुन्हा एकदा पाहायला मिळाली.…

खासदार गिरीश बापट गेले….. पण जनसंपर्क कार्यालयातील कामकाज नाही थांबले

Posted by - March 30, 2023 0
खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बापट यांना जाऊन २४ तास उलटत…

पुणे : महागाईच्या राक्षसाच्या विरोधात आम आदमी पार्टीने काढली गॅस सिलेंडरची आणि विजेची अंत्ययात्रा

Posted by - July 14, 2022 0
पुणे : महागाईच्या राक्षसाच्या विरोधात ‘आप’ पुणे कडून बुधवारी गॅस सिलेंडरची व विजेची अंत्ययात्रा काढण्यात आली.सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *