Maharashtra Highway

Maharashtra Highway : महाराष्ट्रात तयार होणार ‘हे’ 3 नवीन महामार्ग

2975 0

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्गांचा विकास होण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) रस्ते बांधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. राज्यात समृद्धी महामार्गासारख्या हायटेक महामार्गाची उभारणी जवळपास अंतिम टप्प्यात आली असून येत्या काही दिवसात काम सुरु होणार आहे.

आतापर्यंत 701 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण होऊन वाहतूक सुरू झाली असून उर्वरित 76 किमी लांबीचे काम जुलै 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्गावरून नागपूर ते मुंबई असा पूर्णपणे प्रवास करणे शक्य होणार आहे. एकीकडे समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असताना महाराष्ट्रात आणखी काही नवीन महामार्गाची उभारणी करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून प्रयत्न सुरु झाले आहेत. येत्या काही वर्षात राज्यात 3 नवीन महामार्गाची निर्मती होणार असून यामध्ये पुणे रिंग रोड, विरार-अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर आणि समृद्धी महामार्गचा विस्तारित मार्ग म्हणजेच जालना-नांदेड समृद्धी महामार्ग विकसित करण्याची तयारी सुरू होणार आहे.

विशेष महामार्गाच्या कामांसाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरू असून तिन्ही प्रकल्पांच्या कामासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. या तिन्ही प्रकल्पांचे काम 26 पॅकेजमध्ये होणार असून त्या करीता 82 निविदा भरण्यात आल्या होत्या आणि या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवल्या आहेत. एकूण 19 कंपन्या पात्र ठरल्या असून या प्रकल्पांसाठी या कंपन्यांनी 82 निविदा सादर केल्या आहेत. गुरुवारी विशेष तांत्रिक निविदा उघडण्यात आल्या असून एका पॅकेजच्या कामासाठी तीन ते पाच कंपन्यांनी निविदा दिल्या आहेत.

‘हे’ असतील नवीन महामार्ग-
विरार-अलिबाग महामार्ग
विरार अलिबाग महामार्ग हा 128 किलोमीटर लांबीचा असणार आहे. विरार-अलिबाग महामार्ग प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 96 किलोमीटर लांबीचा मार्ग उभारण्यात येणार आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 8 वरील नवघर ते पेण आणि राष्ट्रीय महामार्ग 66 वरील बलावली गावाचा समावेश करण्यात येणार आहे. एकूण 11 पॅकेजमध्ये प्रकल्पाचे काम केले जाणार असून अंदाजे 60 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

पुणे रिंगरोड
पुणे रिंगरोड हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असणार आहे. पुण्यातील हा रिंग रोड 172 किलोमीटर लांबीचा असून 110 मीटर रुंद असणार आहे. या रिंगरोड प्रकल्पामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या पप्रमाणात दूर होणार आहे. पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 136 किलोमीटर लांबीचे काम केले जाणार असून हे काम 9 पॅकेजमध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 16 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

जालना-नांदेड समृद्धी महामार्ग
जालना ते नांदेड महामार्ग 190 किमी लांबीचा असणार असून या समृद्धी महामार्गाचा विस्तार नांदेडपर्यंत होणार आहे. तसेच हा महामार्ग मराठवाड्यातील विकासामार्फतच चालवण्यात येणार आहे. जालना-नांदेड समृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एकूण 6 पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Uddhav Thackeray : आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतो फडणवीसांनी शब्द दिला होता; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

Pune Crime : पुणे हादरलं ! 40 रुपये उधार ठेवले नाही म्हणून तरुणाला कोयत्याने केली मारहाण

Weather Update : हवामान विभागाने पावसासंदर्भात दिला ‘हा’ नवा अलर्ट

Share This News

Related Post

देहूनगरीमध्ये आजपासून मांस, मच्छी विक्री आणि नदीतील मासे पकडण्यास बंदी

Posted by - April 1, 2022 0
पिंपरी – आज, शुक्रवार १ एप्रिलपासून श्रीक्षेत्र देहू नगरीत मांस, मच्छी विक्री आणि इंद्रायणी नदीतील मासे पकडण्यास बंदी घालण्यात आली…

छत्रपती शिवरायांच्या अवमान प्रकरणी 13 डिसेंबर रोजी ‘पुणे बंद’ची हाक

Posted by - December 7, 2022 0
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व इतर वाचाळवीरांच्या निषेधार्थ येत्या 13 डिसेंबर रोजी पुणे बंदची…

मोठी बातमी! शिवसेना नेते संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी

Posted by - August 1, 2022 0
मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जामीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांच्या संदर्भातील एक मोठी बातमी समोर…

#Latest Updates : कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात वाचा , अत्यंत चुरशीची लढत , आतापर्यंत काय झाले ?

Posted by - March 2, 2023 0
पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठीची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारांची धाकधूक सातत्याने वाढते आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *