Mumbai Map

महाराष्ट्रात जिल्ह्यांची संख्या वाढणार; नवीन यादी आली समोर

25076 0

मुंबई : राज्यात 2014 पासून नवीन जिल्हा (New District) तयार झालेला नाही. यामुळे लोकसंख्येनुसार (Population) जिल्ह्याचे कामकाज पाहताना प्रशासकीय यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. या सगळ्याचा विचार करून राज्य शासनाने भौगोलिक दृष्ट्या मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हे तयार करण्याची योजना आखली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज आपण महाराष्ट्रात कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार आहे ते पाहूया….

अहमदनगर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर, शिर्डी आणि संगमनेर या तीन नवीन जिल्ह्यांची निर्मिती केली जाणार आहे.
याशिवाय नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
पालघरचे विभाजन करून जव्हार हा जिल्हा बनवणे प्रस्तावित करण्यात आले आहे.
ठाणे जिल्हा विभाजन करून मीरा भाईंदर, कल्याण हे दोन नवीन जिल्हे बनवणे प्रस्तावित आहे.
पुणे जिल्ह्याचे विभाजन करून शिवनेरी जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे. विशेष बाब म्हणजे आमदार महेश लांडगे यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या जिल्ह्याची मागणी केली होती.
याशिवाय रायगड जिल्ह्याचे विभाजन करून महाड जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
सातारा जिल्ह्याचे विभाजन करून मानदेश हा नवीन जिल्हा तयार करणे.
रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून मानगड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
बीड जिल्हा विभाजित करून आंबेजोगाई जिल्हा तयार केला जाणार आहे.
लातूर मधून उदगीर आणि नांदेड जिल्ह्यातून किनवट हा नवीन जिल्हा तयार होणार आहे.
जळगावमधून भुसावळ अन बुलढाणामधून खामगाव हे जिल्हे तयार होणार आहेत.
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर जिल्हा तयार केला जाणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
भंडारा जिल्ह्याचे विभाजन करून साकोली हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा तयार केला जाणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून अहेरी हा नवीन जिल्हा तयार केला जाणार आहे.

Share This News

Related Post

Supriya Sule

Supriya Sule : मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून सुप्रिया सुळेंनी केली देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

Posted by - October 30, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं शांततेत उपोषण आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे आरक्षण…

राज ठाकरे ‘या’ दिवशी करणार अयोध्या दौरा

Posted by - April 17, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय पुणे दौऱ्यावर असून आज पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे…

Adv. Hasan Patel : माजी आमदार पाशा पटेल यांना पुत्रशोक ; वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Posted by - August 26, 2022 0
लातूर : आज सकाळी ऍड. हसन पटेल यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 38 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त…

आत्महत्या नव्हे ती हत्याच ! सहा महिन्यांपूर्वी झालेल्या अपघाताचा संदर्भ; सात जणांची निर्दयीपणे हत्या; चुलत भावांनीच उध्वस्त केले संपूर्ण कुटुंब; असा झाला उलगडा

Posted by - January 25, 2023 0
दौंड : तालुक्यातील पारगाव मध्ये भीमा नदीच्या पात्रात 18 तारखेला एका स्त्रीचा मृतदेह मासे पकडणाऱ्या व्यवसायिकांना सापडून आला होता. त्या…
Traffic News

Traffic News : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी; पुण्यात लांबच लांब रांगा

Posted by - July 19, 2023 0
पुणे : मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर आज पुन्हा एकदा वाहतूक कोंडी (Traffic News) झाल्याचे पाहायला मिळत आहे. सुमारे 3 किलोमीटर लांबपर्यंत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *