संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी, रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी करणार- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची घोषणा

334 0

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली याचा आपण तीव्र निषेध करतो.

या प्रकरणात संपूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी असून उद्या रविवारी प्रत्येक जिल्ह्यात भाजपाचे कार्यकर्ते नोटिशीची होळी करून निषेध नोंदवतील, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांना सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या मंत्र्यांची भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर पडत आहेत. एका मागोमाग एक मंत्री तुरुंगात जात आहेत. त्यांचा पापाचा घडा भरत आहे. यामुळे आघाडीचे नेते घाबरून गेले आहेत. परिणामी त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना अडविण्याचा प्रयत्न चालविला आहे.

पण त्यांचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. महाविकास आघाडीची वाटचाल विनाशाकडे होत आहे.

त्यांनी सांगितले की, मा. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्षनेत्याला माहिती मिळविण्याचा विशेषाधिकार असतो.

त्यांना माहिती कोठून मिळाली असे विचारता येत नाही. तरीही या सरकारने बेकायदेशीर रितीने त्यांना नोटीस पाठवली. हे सरकार वारंवार कायदा धाब्यावर बसवून काम करत आहे. परिणामी त्यांना अनेकदा न्यायालयाकडून थपडा खाव्या लागल्या आहेत. अनिल देशमुख, सचिन वाझे, भाजपाच्या बारा आमदारांचे निलंबन अशा अनेक प्रकरणात या सरकारला न्यायालयाचे फटके बसले आहेत.

ते म्हणाले की, बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर त्याची तपशीलवार माहिती असलेला पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी त्याच दिवशी केंद्रीय गृहसचिवांकडे तपासासाठी सादर केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.

अशा रितीने देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून हा तपास रोखता येणार नाही. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघड होण्याची शक्यता असल्याचं पाटील म्हणाले

Share This News

Related Post

Shrikant Sarmalkar

Shrikant Sarmalkar : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं निधन

Posted by - January 22, 2024 0
मुंबई : शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत सरमळकर यांचं (Shrikant Sarmalkar) दीर्घ आजाराने निधन झालं आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा…

Chandrakant Patil : राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग…
BJP Logo

Loksabha Elections 2024 : भाजप महाराष्ट्रातून किती जागा लढणार? संभाव्य यादी आली समोर

Posted by - March 6, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections 2024) जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले आहेत. सध्या अमित शाह…

Pune News : अचानक पुणे पोलीस आयुक्तालयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल

Posted by - May 21, 2024 0
पुणे : नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत. त्यांचा कोणताही…

मोठी बातमी : रोझरी स्कूलचे संचालक विनय आ-हाना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीचा छापा; वाचा सविस्तर प्रकरण…

Posted by - January 30, 2023 0
पुणे : पुण्यातील रोझरी स्कूलचे संचालक विनय आराना यांच्या बंगल्यावर आणि ऑफिसवर ईडीन धाड टाकली आहे. पिंपरी चिंचवड मधील सेवा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *