Talathi exam 2023

Talathi exam 2023 : तलाठी परीक्षेत सावळा गोंधळ; पेपर उशिरा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांना सहन करावा लागला मनस्ताप

286 0

नागपूर : तलाठी भरती परीक्षेत (Talathi exam 2023) सावळा गोंधळ सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात (Talathi exam 2023) नुकसान होत आहे. सर्व्हर डाऊन असल्याचे सांगून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला आहे. प्रवेश न मिळाल्याने परीक्षार्थी संभ्रमात आहेत. सध्या यावरुन राज्यात मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाला आहे.

काय घडले नेमके?
राज्यातील तलाठी परिक्षार्थींचा पेपर अखेर दीड तास उशीराने सुरु होणार आहे. सर्व्हर सुरळीत झाल्याने परिक्षार्थींना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला आहे. सकाळी 9 ते 11 या वेळात पेपर होता, पण आता हा पेपर उशिराने सुरू होणार आहे. दुपारी 12.30 वाजताचा पेपर सुद्धा उशिराने सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. परीक्षा घेणाऱ्या कंपनींच्या भोंगळ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला आहे.

सकाळी 7.30 ला परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर बोलवण्यात आलं होतं. मात्र त्यांना हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेर ताटकळत उभे रहावे लागले.राज्यात सर्वत्र तलाठी पदासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षा अद्याप पर्यंत सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे.

Share This News

Related Post

….अखेर “त्या” व्हायरल पत्रावर एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण

Posted by - March 8, 2022 0
एसटी संपातून माघार घेत पुन्हा कामावर रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पत्र व्हायरल झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांमध्ये…

नेते म्हणतात तयारीला लागा… कार्यकर्ते म्हणतात आधी तारखा तर सांगा !

Posted by - August 7, 2022 0
आज निवडणुका होतील, उद्या निवडणुका होतील म्हणून इच्छुक उमेदवार केव्हापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत मात्र निवडणुकांना मुहूर्त काही लागेना. तिकडं…
Hingoli News

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

Posted by - December 5, 2023 0
हिंगोली : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. हिंगोलीमधील (Hingoli News) सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकअपचा आणि मोटारसायकलचा अपघात‌…

रवी राणा बच्चू कडू यांच्यातील वाद मिटविण्याची शक्यता

Posted by - October 30, 2022 0
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके…
Yavatmal Crime

Yavatmal Crime : यवतमाळ हादरलं ! अज्ञात आरोपींकडून तरुणाची निर्घृणपणे हत्या

Posted by - October 27, 2023 0
यवतमाळ : यवतमाळ (Yavatmal Crime) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्णीमध्ये एका ऑटोचालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *