Rahul Kul

बारामती लोकसभेसाठी आत्तापासूनच कामाला लागा : राहुल कुल

591 0

हडपसर : तालुका निहाय आपल्या पक्षाची ताकद किती आहे. पक्षाची बलस्थाने काय आहेत, हे आपण जाणता. येणाऱ्या काही काळात आपण बारामती लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे व प्रत्येक बूथ सक्षम होण्यासाठी अधिक जोमाने कामाला लागावे असे आवाहन भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख व आमदार राहुल कुल यांनी केले.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी आमदार राहुल कुल व पुरंदर विधानसभा निवडणुकीच्या प्रमुखपदी बाबाराजे जाधवराव यांची निवड झाली आहे. त्यानिमित्ताने पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने शेवाळेवाडी येथे या दोघांचाही सत्कार जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गिरीश जगताप , सचिन लंबाते, निलेश जगताप, श्रीकांत ताम्हाणे, संजय निगडे, आनंद जगताप, राजेंद्र काळे, अमित झेंडे, माऊली चौरे, संतोष हरपळे आदिंसह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राहुल कुल म्हणाले की वरिष्ठांशी चर्चा करून लवकरच मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी सवांद साधला जाईल. तसेच पुढील नियोजन करण्यासाठी प्रत्येक मंडळात बैठकीचे आयोजन केले जाईल.

Share This News

Related Post

सुभाष जगताप यांच्यावरील गुन्ह्याचा जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

Posted by - June 6, 2022 0
पुणे- पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते, माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी जिल्हा मातंग समाजातर्फे निषेध…

रावणाचा जीव बेंबीत तर काहींचा मुंबईत, मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Posted by - March 25, 2022 0
मुंबई – रावणाचा जीव जसा बेंबीत होता. मात्र काही जणांना केंद्रात सरकार मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे, अशी खोचक…
Samruddhi Highway Accident

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात

Posted by - June 1, 2024 0
नागपूर : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेईना. समृद्धी महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून हा महामार्ग अपघाताचे (Samruddhi Highway Accident)…

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत

Posted by - August 8, 2022 0
पुणे: सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात माजी मंत्री आणि सध्या शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *