ST-Bus

ST Bus : प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा ! आता रेल्वेप्रमाणेच एसटी बसचं लोकेशन करता येणार ट्रॅक

1720 0

छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दररोज हजारो प्रवासी एसटी बसनं (ST Bus) प्रवास करतात. हा प्रवास स्वस्त आणि सुरक्षित मानला जातो.सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीमध्ये (ST Bus) अनेक बदल केले जात आहेत. यामध्ये आता आणखी एका सुविधेची भर पडली आहे. ती म्हणजे आता रेल्वेप्रमाणेच घरबसल्या एसटी बसचे लोकेशनदेखील ट्रॅक करता येणार आहे. सध्या या अ‍ॅपवर काम सुरु आहे.

ST Bus Video : पहिल्याच पावसात एसटीला गळती; प्रवाशांनी बसमध्येच छत्री उघडून केला प्रवास

सर्वसामान्य प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसचे लोकेशन आता घर बसल्या ट्रॅक करता येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या एमएसआरटीसी ॲपची सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहे. सध्या या सुविधेची चाचणी सुरू असून, यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Air Ambulance : समृद्धी महामार्गावर लवकरच एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरु करणार: राज्य सरकारचा मोठा निर्णय

छत्रपती संभाजीनगर विभागातून सुमारे 550 बसेस विविध मार्गावर धावतात, या सर्व बसमध्ये ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. मात्र सध्या या ॲपची सेवा केवळ अधिकारी, कर्मचारी यांच्या पुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे. एसटीचे (ST Bus) लोकेशन बरोबर मिळत आहे कि नाही याची सध्या चाचणी सुरु आहे. यातील काही तांत्रिक अडचणी दूर करून लवकरच ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Share This News

Related Post

Kamble Couple

Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान

Posted by - January 21, 2024 0
नवी मुंबई : 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir) होणार आहे. दरम्यान देशभरातील 11 जोडप्यांना या महापुजेचा मान मिळाला…

#GOUTAMI PATIL : नृत्यांगणा गौतमी पाटीलचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल ; “मी करते तुम्हाला मुजरा…!” नक्की पहा गौतमीचा हा अंदाज

Posted by - February 8, 2023 0
मनोरंजन : महाराष्ट्राला आपल्या नृत्य कलेने आणि सौंदर्याने भुरळ घालणारी कलाकार गौतमी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या गाण्याची चाहूल दिली…

अभिनेता सुनील शेंडे यांचे निधन, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : आपल्या चतुरस्त्र अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट तसेच हिंदी चित्रपट सृष्टी गाजणारे जेष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे सोमवारी निधन…

यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा महोत्सवाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - January 13, 2023 0
यशस्वी खेळाडूंना स्वत:कडून प्रत्येकी एक हजाराचे क्रीडा साहित्य देण्याची पालकमंत्र्यांची घोषणा पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित यशवंतराव चव्हाण जिल्हास्तरीय…

देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी ते भाजपाचे विधानपरिषदेचे उमेदवार; कोण आहेत श्रीकांत भारतीय ?

Posted by - June 8, 2022 0
मुंबई- राज्यात विधानपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भारतीय जनता पक्षाने आज आपले उमेदवार घोषित केले आहेत. विधान…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *