मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला; शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे काळाच्या पडद्याआड

321 0

मुंबई: शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या गाडीला आज रविवारी पहाटे भीषण अपघात झाला. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या दिशेने येताना मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीला अपघात झाला. माडप बोगद्यात ही दुर्घटना घडली. सकाळी 5 वाजता हा अपघात झाला. अपघातात मेटे यांना हात-पाय आणि डोक्याला मार लागला होता. अपघातानंतर जवळपास तासभर मदत मिळाली नाही, खूप वेळ फोन करूनही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत, अशी माहिती मेटेंच्या सहका-यांनी दिली.

विनायक मेटे हे मराठा समाजासाठी लढा देणारे नेते होते. मराठा क्रांती मुक मोर्चा आयोजनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. 2014 पर्यंत ते काँग्रेसमध्ये होते. नंतर त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली. 3 जून 2016 रोजी त्यांची महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली. 2022 पर्यंत ते विधान परिषदेचे आमदार होते.

Share This News

Related Post

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेला परवानगी मिळण्याची दाट शक्यता ?

Posted by - April 28, 2022 0
1 मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा औरंगाबाद मधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर आयोजित…

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात

Posted by - January 30, 2022 0
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर शिलाटणे गावाजवळ कार आणि कंटेनर यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.…

साफसफाई काम सुरू असताना मोशी औद्योगिक वसाहतीत स्फोट ; 8 जण जखमी

Posted by - March 18, 2022 0
पिंपरी-चिंचवड  टाउनशिपमधील मोशी परिसरात एका धातूच्या स्क्रॅप युनिटमध्ये स्फोट झाला.यात आठजण किरकोळ जखमी झाले. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली…

#कसबापोटनिवडणूक : हेमंत रासने सोमवारी दाखल करणार उमेदवारी अर्ज

Posted by - February 5, 2023 0
पुणे: भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाले असून या पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत…

शेतकऱ्यांना गांजा पिकविण्याची परवानगी द्या ; हतबल शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना ई-मेल

Posted by - January 31, 2022 0
शेतकऱ्यांना आपल्या शेतात गांजा पिकविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. अविनाश अनेराये असं…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *