Sanjay Raut

‘मविआ’चा लोकसभेचा फॉर्म्युला ठरला?

308 0

मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकसंध ठेवून लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले. त्यातच आता लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याचा फॉर्मुला ठरल्याची घटना राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून लोकसभेच्या वीस जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (NCP) समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

यासंदर्भात मविआची एक बैठकही पार पडली आहे. या बैठकीमध्ये लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्याबाबत काँग्रेस (Congress) पक्ष आग्रही आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील. दादरा नगर हवेलीमधून देखील आमचा एक खासदार विजयी होईल. लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Share This News

Related Post

Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील संध्याकाळी मोठी घोषणा करणार ? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा घेणार जरांगेची भेट

Posted by - September 13, 2023 0
मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाचा आज 13 वा दिवस आहे. आजही त्यांचं उपोषण…
Aundhkar

बिल्डरकडे 2.50 लाखांची मागणी करणारा ‘हा’ अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Posted by - May 17, 2023 0
सांगली : विटा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यास लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या (Anti-corruption) अधिकाऱ्यांनी रंगेहाथ (Raid Hand) पकडले आहे. विनायक औंधकर (Vinayak Aundhkar)…
Latur Killari Earthquake

Latur Killari Earthquake : एका क्षणात झालं होत्याचं नव्हतं; 30 वर्षांपूर्वी किल्लारीत नेमकं काय घडलं?

Posted by - September 30, 2023 0
लातूर : तारीख 29 सप्टेंबर 1993… अनंत चतुर्दशीचा दिवस… हा दिवस कोणच विसरू नाही शकत. या दिवशी घडलेल्या घटनेने (Latur…
Viral Video

Viral Video : गुलाबी शरारा फेम ‘त्या’ शिक्षिकेने राम लल्लाच्या गाण्यावर धरला विद्यार्थांसोबत ठेका

Posted by - January 20, 2024 0
मुंबई : सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ (Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात. देशभरात सर्वत्र 22 जानेवारीची जोरदार तयारी सुरु…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *