Samruddhi Mahamarga

समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ मोठे पाऊल

518 0

शिर्डी : समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी आता सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. आजपासून टायर तपासणी करूनच समृद्धी महामार्गावर वाहने सोडली जाणार आहेत. यासाठी शिर्डी इंटरचेंजवर वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. ज्या वाहनांचा टायर खराब असेल त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश देण्यात येणार नाही अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली आहे.

शिर्डीच्या (Shirdi) इंटरचेंजवर आज परिवहन आयुक्त विवेक भिमनवार (Transport Commissioner Vivek Bhimanwar) यांच्या हस्ते तपासणी केंद्राचे उद्घाटन झाले. टायर तपासणी केंद्रावर वाहनांची तपासणी मोफत होणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या शिर्डी व नागपूर या दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर आणि दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा सुरु करण्यात आला आहे. या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या टायर तपासणी केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टायर तपासणी केंद्रावर नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पीन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ह्या सगळ्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.

Share This News

Related Post

पुणे महापालिकेकडून गुंठेवारी नियमितीकरणाला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Posted by - April 2, 2022 0
पुणे- पुणे महापालिका प्रशासनाने गुंठेवारी नियमितीकरणाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. आता 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम…

महत्त्वाची बातमी : तुमचे ट्विटर अकाउंट हॅक तर झाले नाही ना ? 200 दशलक्ष होऊन अधिक ट्विटर युजरचा ईमेल आयडी चोरीला, सिक्युरिटी रिसर्चच्या रिपोर्ट नुसार…

Posted by - January 6, 2023 0
महत्त्वाची बातमी : सिक्युरिटी रिसर्च रिपोर्टच्या दाव्यानुसार 200 दशलक्ष हून अधिक ट्विटर युजरचा ई-मेल आयडी चोरीला गेला आहे. ही एक…
Pankaja-Munde

Pankaja Munde : बीडमध्ये पंकजा मुंडेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर; चर्चेला उधाण

Posted by - September 9, 2023 0
बीड : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख…

#PAKISTAN : पेशावरमध्ये नमाज सुरू असताना हल्लेखोराने बॉम्बने स्वतःला उडवलं ; 28 जणांचा मृत्यू, 150 जण जखमी

Posted by - January 30, 2023 0
पाकिस्तान (पेशावर) : पेशावरमधून एक धक्कादायक वृत्त समोर येते आहे. येथील एका मशिदीमध्ये नमाज पठण सुरू असताना एका हल्लेखोराने बॉम्ब…

खासदार संजय राऊतांच्या अडचणी वाढ ! विधानसभा अध्यक्षांकडून आजच हक्कभंग समिती नेमली जाणार

Posted by - March 1, 2023 0
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ‘विधीमंडळ नाही चोरमंडळ आहे’, असं वक्तव्य संजय राऊत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *