Sameer Wankhede

वानखेडेंच्या अडचणीत वाढ! ‘यांच्या’ साक्षीमुळे जाणार तुरुंगात?

813 0

मुंबई : बॉलीवूडचा (Bollywood) किंग शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्स प्रकरणी (Drugs case) अटक केलेले एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB officer Sameer Wankhede) यांच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयनं त्यांच्याविरोधात जी तक्रार दाखल केली त्यामधून सध्या अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमनं जी कारवाई केली त्यामध्ये काही नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली होती. यादरम्यान वानखेडे आणि त्यांच्या टीमनं आर्यन खानसोबत पैशांचे डील केल्याचे समोर आले होते.

यावेळी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने शाहरुखच्या मॅनेजरकडे 25 कोटींची मागणी केली होती. तर 50 लाख रुपये हे टोकन अमाऊंट म्हणून घेतल्याचे समोर आले आहे. आता या सगळ्या प्रकरणात शाहरुखची मॅनेजर पुजा ददलानी (Pooja Dadlani) हिची साक्ष महत्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता पुजा ददलानी आपल्या साक्षीमध्ये काय बोलणार यावर समीर वानखेडेवरील कारवाई अवलंबून असणार आहे.

सीबीआयनं (CBI) वानखेडे यांच्यावर खंडणी (Extortion) घेतल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Share This News

Related Post

#TIKTOK : रिल्स बनवण्याच्या नादात पुण्यातील दोघा प्रसिद्ध TIKTOK स्टारने उडवले महिलेला; महिलेचा जागीच मृत्यू

Posted by - March 8, 2023 0
पुणे : आज-काल रील्स बनवून त्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणी चांगला पैसा कमवत आहे. अनेक जण अगदी टिक टोक स्टार्स होऊन…

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2022 : विजयादशमी निमित्त खोखो खेळाडू संघांनी लुटले सुवर्ण ! खोखो स्पर्धेत महाराष्ट्राचा गोल्डन धमाका

Posted by - October 4, 2022 0
अहमदाबाद : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष संघांनी दस-याच्या पू्र्वसंध्येला सुवर्णपदक जिंकून विजयादशमीचे सोने लुटले. दोन्ही गटात निविर्वाद…

#BTS ARMY : J. Hope देखील सैन्यात भरती होणार, जाण्यापूर्वी त्याने चाहत्यांशी संवाद साधला

Posted by - February 26, 2023 0
काही तासांपूर्वी बिगित म्युझिकने आपल्या चाहत्यांना सांगितले होते की, त्यांचा खास सदस्य जय होप लष्करात आहे. यानंतर रविवारी जय होपने…

#Latest Updates : कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात वाचा , अत्यंत चुरशीची लढत , आतापर्यंत काय झाले ?

Posted by - March 2, 2023 0
पुणे : आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठीची प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे. दरम्यान उमेदवारांची धाकधूक सातत्याने वाढते आहे.…

पुणे : आमचं चिन्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे; पुण्यातील फलकाची राजकीय वर्तुळात चर्चा

Posted by - October 10, 2022 0
पुणे : निवडणूक आयोगाकडूनधनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आल्यानं ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *