Madan Das Devi

Madan Das Devi Passed Away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी मदन दास देवी यांचं निधन

420 0

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदन दास देवी (Madan Das Devi) यांचे आज पहाटेच्या सुमारास बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. मदन दास देवी (Madan Das Devi) हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मदनदास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले. आयुष्यातील जवळपास 70 वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते. विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक नेत्यांची जडणघडण केली. अरूण जेटली, अनंत कुमार, सुशिल मोदी, शिवराज सिंग चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे अशा अनेक भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याकडून समाजकार्य संघटनेचे शिक्षण घेतले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आदरणीय मदनदास देवी (Madan Das Devi) यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले आहे. विद्यार्थी जीवनापासून मला मदनदासजींसोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून संघटन कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली. चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतरही त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला देश आणि समाजासाठी समर्पित करत आपले काम सुरू केले. स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून त्यांनी देशातील कोट्यवधी युवकांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने देशाने एक दिग्गज गमावला आहे. मदनदासजींचे कार्य, त्यांची मूल्ये माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो. ॐ शांती. असे ट्विट करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मदन दास देवी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Share This News

Related Post

drowning hands

Bhiwandi News : तळ्यात पोहोण्यासाठी गेलेल्या दोन चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 16, 2023 0
भिवंडी : भिवंडीमधून (Bhiwandi News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मित्रांसोबत तळ्यात पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा तलावाच्या…
Solapur News

Solapur News : बाप -लेकीच्या नात्याला काळिमा ! मुलीची प्रियकराच्या मदतीने जन्मदात्याला मारहाण; कारण ऐकून बसेल धक्का

Posted by - August 9, 2023 0
सोलापूर : सोलापूरमधून (Solapur News) बाप – लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये (Solapur News) प्रेमविवाहाला विरोध…

धक्कादायक : धुळ्यात अवघ्या 3,400 रुपयांच्या वादातून 39 वर्षीय तरुणाची गोळ्या घालून हत्या (VIDEO)

Posted by - August 6, 2022 0
धुळे : धुळे शहरातील कुमार नगर भागात राहणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाचा तीन अज्ञातांनी गोळीबार करत खून केल्याची खळबळ जनक…

IPS अमिताभ गुप्ता यांनी स्वीकारला राज्य कारागृह प्रमुख पदाचा पदभार

Posted by - December 18, 2022 0
पुणे : पुण्याचे माजी पोलीस आयुक्त यांनी आज सकाळी राज्य कारागृहप्रमुख पदाचा पदभार अप्पर पोलीस महासंचालक रितेश कुमार यांच्याकडून स्वीकारला…
Gadchiroli News

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 24, 2023 0
गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या एका 12 वर्षीय…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *