बारसूतील रिफायनरीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध, रस्त्यावर झोपून महिलांनी अडवली पोलिसांची वाट

1870 0

राजापूर- रत्नागिरी जवळील बारसूमध्ये नियोजित रिफायनरी प्रकल्पाला (refinery protest)ग्रामस्थांचा तीव्र विरोध होत असल्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मंगळवारी सकाळी बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण केले जाणार असल्यामुळे पोलिसांच्या आणखी काही गाड्या बारसूमध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या. या गाड्या अडवण्यासाठी आंदोलनकर्त्या महिला रस्त्यावर झोपून राहिल्याआहेत. त्यामुळे बारसू परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोकणात राजापूर बारसू सोलगाव परिसरात क्रूड ऑइल रिफायनिंग करणारी ‘रत्नागिरी रिफायनरी व पेट्रोलियम उद्योग’ प्रस्तावित आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लि. यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तावित रिफायनरीला स्थानिकांचा विरोध (refinery protest) आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे. बारसू परिसरातील जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. मात्र आज मंगळवारी सकाळी पोलिसांची वाट अडवत आंदोलनकर्त्या महिला रस्त्यावर झोपून राहिल्या. त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या एकूणच प्रकारामुळे बारसू परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार

खारघर आणि पेण येथून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा येथे दाखल झाला आहे. एकंदरीत या सगळ्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वतः लक्ष देऊन आहेत. दरम्यान, या प्रकरणी कोकणातील बारसू सोलगाव रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबईचे अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना काल राजापूरमध्ये पोलिसांनी अटक केली. आता या आंदोलनाने आक्रमक पवित्रा घेतला असून हा प्रकल्प जोपर्यंत महाराष्ट्रातून हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

२५ महिलांना अटक

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलन करणाऱ्या २५ महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पोलिसांनी आंदोलन (refinery protest) करणाऱ्या महिलांवर सौम्य लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News

Related Post

Breaking News, राज ठाकरे यांची सभा रद्द करण्यासाठी याचिका दाखल करणाऱ्यालाच एक लाखांचा दंड

Posted by - April 29, 2022 0
औरंगाबाद- राज ठाकरे यांची सभा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

Posted by - July 4, 2022 0
विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत…

सीएसएमटी पुनर्विकास प्रकल्प रेल्वे बोर्डाकडे; ‘आरएलडीए’कडून अर्थसंकल्पीय मंजुरीसाठी प्रस्ताव

Posted by - July 14, 2022 0
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानक पुनर्विकासाला गती देण्यासाठी हा प्रकल्प रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने (RLDA), (रेल्वे लॅण्ड…

‘त्या’ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार नाही ; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा

Posted by - April 10, 2022 0
आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसापूर्वी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *