अयोध्येतील राम मंदिरात (Ram Mandir) आज सोमवार 22 जानेवारीला अभिजीत मुहूर्तावर प्रभू रामललाच्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस आहे. यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. आज दुपारी हा सोहळा पार पडणार आहे.दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला सुरूवात होईल. या सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती असेल. बऱ्याच आमंत्रितांचीही या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे. राम मंदिर निर्माण आंदोलन आणि तत्सम गोष्टींमध्ये मुख्य सहभाग नोंदवणारे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मात्र या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत.
‘या’ कारणामुळे लालकृष्ण अडवाणी राहणार लालकृष्ण अडवाणी ?
लालकृष्ण अडवाणी यांचं वय 96 वर्षे असून, त्यांच्या प्रकृतीला केंद्रस्थानी ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. अयोध्येमध्ये सध्याच्या घडीला कडाक्याची थंडी पडली असून, त्यामुळं अडवाणी यांना उतारवयात कोणताही त्रास होऊ नये यासाठी ते या सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि आलोक कुमार यांनी अडवाणी यांच्या घरी जात त्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित केलं होतं. त्यावेळी आपल्याला या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे ही मोठी भाग्याचीच बाब असल्याची प्रतिक्रिया अडवाणी यांनी दिली होती.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Mohit Pandey : मोहित पांडे यांना मिळाले राम मंदिराच्या पुजाऱ्याचं स्थान
Ram Mandir : श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्यावेळी ‘या’ 8 जणांनी बजावली होती महत्वाची भूमिका
Ram Mandir Ayodhya : रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठासाठी ‘या’ लोकांना देण्यात आले निमंत्रण
Shri Ram Chalisa : नित्य श्रीराम चालीसाचे पठण केल्याने होतात ‘हे’ मोठे फायदे
Ram Mandir : 22 जानेवारीच्या सार्वजनिक सुट्टीच्या निर्णायाविरोधात न्यायालयात याचिका दाखल
Ram Mandir : 22 जानेवारीला तुमच्या घरी कशाप्रकारे कराल श्रीरामाची पूजा
Ram Mandir : कोण आहे कांबळे दाम्पत्य? ज्यांना महाराष्ट्रातून मिळाला रामलल्लांच्या महापुजेचा मान